Tamil Nadu Govt Replaced Rupee Symbol : तमिळनाडू सरकारने अर्थसंकल्पात रुपयाचे ₹ हे चिन्ह पालटून तमिळ भाषेतील ரூ  हे चिन्ह वापरले !

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन

चेन्नई (तमिळनाडू) – नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि त्रिभाषा धोरण यांवरून तमिळनाडू आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये वाद चालू आहे. या पार्श्वभूमीवर तमिळनाडूच्या द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पातील रुपयासाठीचे ‘₹ ’ हे  चिन्ह तमिळ भाषेत पालटले आहे.

सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ‘₹ ’ या चिन्हाऐवजी ‘ரூ’चिन्ह वापरले. हे तमिळ लिपीतील ‘रु’ अक्षर वापरले आहे. तमिळनाडू सरकार हिंदी भाषेच्या विरोधात आहे.