शनिशिंगणापूर (अहिल्यानगर) येथे मंदिराच्या पश्चिमेला नवे प्रवेशद्वार ! 

शनिशिंगणापूरला भुयारी दर्शन महाद्वाराकडे जाण्यासाठी आता देवस्थान वाहनतळालाच मंदिराच्या पश्चिम दिशेला नवीन प्रवेशद्वाराचे बांधकाम चालू आहे. यामुळे शनिभक्तांचा थेट ‘भुयारी दर्शन महाद्वारा’त प्रवेश होऊ शकणार आहे.

नक्षलग्रस्त गडचिरोली मतदारसंघात मतदानपेट्यांसाठी २९ लाखांचा सुरक्षा कक्ष बांधण्यात येणार !

या कक्षामध्ये मतमोजणी केंद्रे, मतदानानंतर मोहोरबंद मतदान यंत्रे आणि ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रे ठेवण्यात येणार आहेत.

सांगली येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने आज भव्य मेळावा !

श्रीराममंदिर परिसरात असलेल्या जैन कच्छी भवन येथे हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने ९ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता हिंदूंचा भव्य मेळावा आयोजन करण्यात आला आहे.

‘सनातन प्रभात’च्या समूह संपादकपदी श्री. योगेश जलतारे यांची नियुक्ती !

सनातन परिवार, तसेच हिंदुत्वनिष्ठ यांनी श्री. जलतारे यांच्या नियुक्तीचे सहर्ष स्वागत केले आहे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील योगदानासाठी शुभेच्छा दिल्या आहेत !

‘सेट’ परीक्षेला दीड सहस्र परीक्षार्थी अनुपस्थित !

शहरातील २२ परीक्षा केंद्रांवर ८ सहस्र १०५ विद्यार्थ्यांनी ७ एप्रिल या दिवशी ‘सेट’ची परीक्षा दिली. यासाठी ९ सहस्र ६३० परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात दीड सहस्र परीक्षार्थी अनुपस्थित राहिले. ८ सहस्र १३० जणांनी पेपर सोडवला.

पुणे येथील जंगली महाराज रस्त्यावरील बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी सय्यदचा मुंबईतील रुग्णालयात मृत्यू !

सय्यदला कर्करोगाने ग्रासले होते. त्याची प्रकृती खालावल्याने एक महिन्यापूर्वी त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

१० एप्रिलपासून प.पू. डॉ. के.ब. हेडगेवार व्याख्यानमाला !

कोल्हापूर शहरात राष्ट्रीय विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी हिंदु व्यासपीठ प्रतिवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक ‘प.पू. डॉ. के.ब. हेडगेवार’ व्याख्यानमाला आयोजित करते.

India Heat Wave : देशात उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला !

देशातील अनेक भागांत तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. अशा स्थितीत उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला आहे.

Pradeep Sharma : माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती

तसेच त्यांच्या याचिकेवरील सुनावणीलाही न्यायालयाने ४ आठवड्यांसाठी स्थगिती दिली आहे.

Palasnath Temple : ४६ वर्षे पाण्यात राहूनही सुस्थितीत असलेल्या उजनी जलाशयातील पळसनाथ मंदिराकडे पर्यटकांचे पाय वळले !

१ सहस्र वर्षापूर्वी हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेले श्री पळसनाथ मंदिराचे शिखर प्राचीन इतिहासाची साक्ष देत असून गेल्या ४६ वर्षांपासून पाण्यात तग धरून उभे आहे.