नोकरीच्या आमिषाने पुणे येथे आणून तरुणींची विक्री
पुणे – गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात धाड घालून ५ तरुणींची सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुमी बिश्वास, कुंटणखाना व्यवस्थापक विक्रम बिश्वास, विकास मंडोल आणि टॉनी मुल्ला यांना अटक केली आहे. अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाच्या हवालदार रेश्मा कंक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. दोघींना त्यांच्या पतीनेच वेश्या व्यवसायाला प्रवृत्त केल्याचे अन्वेषणातून समोर आले आहे. (कुटुंबव्यवस्था नष्ट झाल्याचे उदाहरण ! – संपादक)
५ महिन्यांपूर्वी बंगालमधून एका तरुणीला नोकरीचे आमीष दाखवून पुण्यात आणले. मुंबईतील तरुणीला चांगल्या वेतनाची नोकरी देण्याविषयी सांगून, तसेच एकीला जयपूर शहरातून कुंटणखान्यात आणले होते. टॉनी मुल्ला आणि विशाल मंडोल यांनी स्वत:च्या पत्नीला गावाहून आणून पुणे येथे वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले.
संपादकीय भूमिकानोकरीचे आमीष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणार्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |