पिथौरागड (उत्तरखंड) – देवभूमी उत्तराखंडमधील बेरिनाग येथे अवैध मशिदीच्या विरोधात स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मशिदीला टाळे ठोकण्याची मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे केली जात आहे. येथील घरात अवैधपणे मशीद चालवण्यात येत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. या संदर्भात १९ नोव्हेंबर या दिवशी येथील जीआयसी मैदानावर भव्य सभा आयोजित करून मशीद हटवण्याची मागणी करण्यात आली. गेल्या २-३ महिन्यांपासून या अवैध बांधकामाला स्थानिक नागरिक विरोध करत आहेत.
प्रशासनाने मशीद कह्यात घ्यावी ! – राष्ट्रीय सेवा संघ
या प्रकरणी राष्ट्रीय सेवा संघाचे अध्यक्ष हिमांशू जोशी म्हणाले की, गेल्या २ महिन्यांपासून हे प्रकरण चालू आहे. ही गोष्ट सर्वांच्या दृष्टीस पडली असून संपूर्ण देश याकडे लक्ष ठेवून आहे. अशा स्थितीत या अवैध मशिदीच्या विरोधात आजचे आंदोलन असून मशीद हटवावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. हे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. ही मालमत्ता त्वरित जप्त करून कह्यात घ्यावी, अशी मागणी आम्ही केली आहे.
सर्वांना समान न्याय हवा !
एका स्थानिक नागरिकाने सांगितले की, माझे घर अवैध असल्याचे सांगून पाडण्यात आले; मग ही मशीद का पाडली जात नाही ? मी येथील रहिवासी असूनही मला कोणतीही नोटीस मिळाली नाही. न्यायालयात कोणतीही सुनावणी झाली नाही. सर्वांसाठी समान न्याय हवा. जसे माझे घर पाडले, तसे हे अवैध बांधकामही पाडले पाहिजे.
संपादकीय भूमिकाउत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना अवैध मशिदीवर कारवाई करण्यासाठी हिंदूंना आंदोलन करावे का लागते ? सरकार स्वतःहून कारवाई का करत नाही ? |