दक्षिण २४ परगणा (बंगाल) – येथील भाजपच्या मथुरापूर शाखेचे सामाजिक माध्यम संयोजक पृथ्वीराज नास्कर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह पक्षाच्या कार्यालयात सापडला. नास्कर ५ नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. कुटुंबियांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला; पण ते सापडले नाहीत. यानंतर त्यांचा मृतदेह कार्यालयात सापडला. पृथ्वीराज नास्कर यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांचे पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्याचे एक जुने छायाचित्रही प्रसारित झाले आहे.
संपादकीय भूमिकाराष्ट्रपती राजवट लागू करणे, हाच या घटना थांबवण्याचा एकमेव मार्ग आहे ! |