‘गॅरेंटी’ (हमी) देण्यासाठी पुष्कळ धैर्य लागते ! – पंतप्रधान मोदी

आम्ही घराघरात वीज दिली, पाण्याची जोडणी दिली, ४ कोटी गरिबांना घरे दिली. ५० कोटींहून अधिक जण अधिकोषाला जोडले गेले. २५ कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढले.

समीर वानखेडे प्रकरणी चौकशीतून काय निष्पन्न झाले ? – मुंबई उच्च न्यायालयाची एन्.सी.बी.ला विचारणा

एन्.सी.बी.ने पाठवलेल्या नोटिसांना वानखेडे यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. याचिका प्रलंबित असल्याने कठोर कारवाई करणार नसल्याची एन्.सी.बी.ची हमी यापुढेही कायम रहाणार आहे.

पुण्याचा पारा ४३.५ अंशांवर; शहरात उन्हाच्या झळा वाढल्या !

पुणे शहराचे सर्वाधिक तापमान एप्रिलमध्ये ४२.८ इतके आहे; मात्र १८ एप्रिलला हडपसरचे कमाल तापमान ४३.५, वडगाव शेरी ४३.१, कोरेगाव पार्क ४३ अंशांवर पोचले होते, तर शिवाजीनगरचा पारा ४१ अंशांवर होता. अन्य सर्व भागाचे तापमान ४२ अंशांवर गेले होते.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी नाव मागे घेतले !

उमेदवारांच्या स्पर्धेतून नाव मागे घेतांना उमेदवारीला विलंब होत असल्यामुळे त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो. त्यामुळे धोका टाळण्यासाठी स्वत:चे नाव मागे घेत असल्याचे भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

महाराष्ट्रात मतांसाठी मद्याचे प्रलोभन, आचारसंहितेच्या काळात ४ सहस्र २५५ गुन्हे नोंद !

मतदारांना मद्य आणि अमली पदार्थ यांचे आमीष दाखवणे अन् त्यातून उमेदवार निवडून येणे ही व्यवस्थेची थट्टा !

महाराष्ट्रातील ५ जागांवर मतदान !

पूर्व विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या ५ मतदारसंघात पहिल्या टप्प्यांतर्गत मतदान झाले. यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नागपूर येथे मतदान केंद्रात निघाला साप !; तृतीय पंथियांसाठी वेगळे मतदान केंद्र…

तृतीय पंथियांसाठी विशेषत्वाने मतदान केंद्र निर्माण करण्यात आले होते. त्यांच्या ‘इंद्रधनुष थीम’ मतदान केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी भेट दिली.  

श्रीरामनवमीला गोरक्षकांवर प्राणघातक आक्रमण होऊनही त्यांनी ७ गोवंशियांचे प्राण वाचवले !

हिंदूंच्या सणांच्या दिवशीच गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होत आहेत. यावरून गोतस्करीच्या समस्येची भीषणता किती आहे ? याची कल्पना येते.

धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेचे ४० टक्के सर्वेक्षण पूर्ण

आतापर्यंत सर्वेक्षणातून अनेक मूर्ती, स्तंभ आणि हिंदूंची धार्मिक चिन्हे असलेल्या कलाकृती सापडल्या !

मोशी, चिखली (पुणे) येथे ‘नीलेश बोराटे सोशल फाऊंडेशन’चा श्रीरामनवमी उत्सव !

ज्ञानवापी सर्वेक्षणात शेवटच्या काही कालावधीमध्ये साक्षात् काशीमुक्तेश्वर अवतरले. जेव्हा देवता अवतरित होतात, तेव्हा धर्मराज्य येणार आहे, हे ओळखावे अन् तेच रामराज्य आता येणार आहे.