Pali Naga Sadhu Attack : पाली (राजस्थान) येथे महंतावर धारदार चाकूने आक्रमण

आरोपी भवानी शंकर याला अटक, आक्रमणाचे कारण अद्याप अस्पष्ट

पाली (राजस्थान) – येथे एका मंदिराचे महंत सुरेश गिरीजी महाराज (वय ६० वर्षे) यांच्यावर नागा साधूच्या वेशात आलेल्या भवानी शंकर नावाच्या तरुणाने प्राणघातक आक्रमण केले. ही घटना १० नोव्हेंबरला सकाळी पावणेसह वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेच्या वेळी मंदिरात इतर काही संतही उपस्थित होते. या तरुणाने महंतांच्यावर चाकूने ५-६ वार केले. या वेळी तेथे उपस्थित असलेल्या अन्य साधूंनी या तरुणाला काठ्यांनी मारहाण केल्यावर तो तेथून पळून गेला. या आक्रमणात घायाळ झालेल्या महंतांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. भवानी शंकर याने या मंदिरातच रात्री निवास केला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या आक्रमणामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.