एटा (उत्तरप्रदेश) – येथे ३ नोव्हेंबरला एका विवाहित हिंदु महिलेचे अपहरण करून तिला बलपूर्वक इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याच्या प्रकरणी फैजान नावाच्या वासनांधाला अटक करण्यात आली. पोलिसांनी पीडितेची सुटका केली आहे. पीडित हिंदु महिलेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
पीडित महिलेच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची पीडित मुलगी तिच्या धाकट्या बहिणीसमवेत शेतात शौचास गेली होती. इतक्यात आरोपी फैजान तेथे पोहोचला. फैजानने चाकू दाखवून त्यांच्या मोठ्या मुलीचे अपहरण केले. त्याने तिचे बलपूर्वक धर्मांतर केले, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.