कत्तलीसाठी नेत असलेल्या ५८ गोवंशियांची मुक्तता, २४ आरोपींना अटक !

छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भ येथून कत्तलीसाठी गोवंशियांची खरेदी करून, भाग्यनगर (हैद्राबाद) येथे नेली जात असतांना यवतमाळ जिल्ह्यातील मनदेवजवळ सापळा लावून स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना पकडले. ६१ पैकी ५८ गोवंशियांना मुक्त केले.

सोलापूर येथे अनुमतीविना झाडे तोडल्याने अधिकार्‍याला ५ लाख रुपये दंड !

शहरातील नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर असलेली ५ झाडे महापालिकेची अनुमती न घेता तोडल्याविषयी पंढरपूर तालुका क्रीडा अधिकारी सत्तेन जाधव यांना प्रत्येकी १ वृक्ष १ लाख रुपये यानुसार ५ लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे.

हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूरची हिंदु पंचांग दिनदर्शिका

हिंदु धर्म संस्कृती आणि परंपरा जतन करणारी, नाविन्यपूर्ण हिंदु कालगणना असणार्‍या या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा चैत्र शुक्ल पंचमी (रविवार, २६ मार्च २०२३) या दिवशी येथील महात्मा बसवेश्वर सदनात सायंकाळी ७ वाजता होणार आहे.

भरणे (खेड) येथे सापडले ८३ गावठी बाँब

तालुक्यातील भरणे येथे एका घरामध्ये ८३ जीवंत गावठी बाँब सापडले असून पोलिसांनी कल्पेश जाधव या संशयिताला चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. ही कारवाई साहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली २३ मार्चच्या सायंकाळी करण्यात आली.

आमदार राजन साळवी यांची तिल्लोरी कुणबी ओबीसी दाखल्यांविषयीची लक्षवेधी

जिल्ह्यातील तिल्लोरी कुणबी बांधवांचे ओबीसी दाखले बंद झाल्याविषयी राज्याच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी लक्षवेधी मांडली.

मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद आणि दर्गे हटवा ! – मनसेकडून प्रशासनाला १५ दिवसांची समयमर्यादा

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट !

राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारणार्‍या सदस्यांना निलंबित करण्यासाठी विरोधकांचा विधानसभेत गदारोळ !

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना पक्षांतील सदस्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांनी सभागृहात घोषणा देत गोंधळ घातला.

(म्हणे) ‘प्रभु श्रीराम केवळ हिंदूंचेच नव्हे, तर सर्वांचे आहेत !’ – फारूख अब्दुल्ला

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदुद्वेषी फारूख अब्दुल्ला यांना श्रीरामाची, तर हिंदुद्वेषी मेहबूबा मुफ्ती यांना भगवान शिवाची आठवण झाली, हे लक्षात घ्या !

बंगालमध्ये श्री शीतलादेवीचा जागराच्या कार्यक्रमावर धर्मांधांचे आक्रमण !

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगालची स्थिती बांगलादेशाप्रमाणे झाल्यामुळे तेथे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !

गोवा : साळावली धरणाची उंची वाढवल्यास त्याचा पर्यावरणावर परिणाम होणार असल्याची पर्यावरणतज्ञांची भीती

साळावली धरणाची उंची वाढवल्यास पाण्याच्या कमतरतेचा प्रश्न सुटणार नाही; मात्र याने पर्यावरण नष्ट होणार. याउलट सरकारने ओसाड भूमीवर वृक्षारोपण करून वृक्षांची वाढ करण्यावर भर दिला पाहिजे.