बंगालमध्ये श्री शीतलादेवीचा जागराच्या कार्यक्रमावर धर्मांधांचे आक्रमण !

घटनास्थळ

कोलकाता – येथील कॉलेज स्ट्रीट येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री शीतलामातेच्या जागराचा कार्यक्रमावर २०० धर्मांधांनी आक्रमण केले. बंगालमधील भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी या घटनेचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक ३८ आणि ४० येथील हिंदूंनी समाजाने श्री शीतलामातेच्या जागराचा कार्यक्रम आयोजित केला होता.

१. भाजपच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने माहिती देतांना सांगितले की, जमावाने देवीच्या जागराच्या कार्यक्रमावर अचानक आक्रमण केले. या वेळी त्यांनी भजने म्हणणारा गायक आणि भाविक यांना मारहाण केल्यामुळे ते गंभीर घायाळ झाले.

२. हे आक्रमण तृणमूल काँग्रेसच्या धर्मांध कार्यकर्त्यांनी केल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या प्रकरणी अमहर्स्ट स्ट्रीट पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे; मात्र पोलिसांनी अजून कारवाई केलेली नाही.

३. हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांवर धर्मांधांनी आक्रमण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील वर्षी, म्हणजे १० एप्रिल २०२२ मध्ये हावडा येथे श्रीरामनवमीच्या निमित्ताने काढण्यात येणार्‍या मिरवणुकीवरही धर्मांधांनी आक्रमण केले होते, तसेच ठिकठिकाणी दुर्गापूजेच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या मंडपांवरही आक्रमण केले होते.

संपादकीय भूमिका

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगालची स्थिती बांगलादेशाप्रमाणे झाल्यामुळे तेथे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !