(म्हणे) ‘प्रभु श्रीराम केवळ हिंदूंचेच नव्हे, तर सर्वांचे आहेत !’ – फारूख अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला

श्रीनगर – भाजपने सत्तेत रहाण्यासाठी श्रीरामाच्या नावाचा वापर केला; परंतु प्रभु श्रीराम केवळ हिंदूंचेच नव्हे, तर मुसलमान, शीख किंवा इतरही समाजांचे आहेत, असे व्यक्तव्य जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केले. पँथर्स पार्टीच्या स्थापना दिवनानिमित्त उधमपूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अब्दुल्ला पुढे म्हणाले, ‘‘एखाद्याचा ‘श्रीराम केवळ हिंदूंचेच आहेत’, असा समज असेल, त्या त्याने तो काढून टाकावा.त्याचप्रमाणे अल्ला केवळ मुसलमानांसाठी नव्हे, तर सर्वांसाठी आहे.’’

संपादकीय भूमिका

  • कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदुद्वेषी फारूख अब्दुल्ला यांना श्रीरामाची, तर हिंदुद्वेषी मेहबूबा मुफ्ती यांना भगवान शिवाची आठवण झाली, हे लक्षात घ्या !
  • काश्मीरमधील हिंदूंचा सर्वाधिक नरसंहार याच नेत्यांच्या कारकीर्दीत झाला, तेव्हा त्यांनी बघ्याची भूमिका घेऊन जिहादी आतंकवादाला एकप्रकारे राजाश्रय दिला, हे हिंदूंनी कदापि विसरू नये !