ब्रिटनहून पुण्यात आलेले १०९ प्रवासी बेपत्ता

इंग्लंडहून १ डिसेंबरपासून पुण्यात आलेल्या प्रवाशांचा थांगपत्ता लागत नसल्याने पुणे महापालिकेने आता शहर पोलिसांकडे धाव घेतली आहे. ब्रिटनहून आलेल्या ५४२ प्रवाशांची सूची राज्यशासनाने पुण्याला दिली होती.

बांधकाम घोटाळ्यांवर कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागणार ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. त्यांनी केलेल्या घोषणांपैकी एकही साहाय्य शेतकर्‍यांना मिळालेले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात बांधकाम घोटाळे झाले असून हे मी उघडकीस आणले आहेत.

संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्याकडे कोट्यवधी रुपये कुठून आले ? याचे अन्वेषण व्हायला हवे ! – किरीट सोमय्या, भाजप

अंमलबजावणी संचालनालयाने सौ. वर्षा राऊत यांना बँके’तील आर्थिक अपहाराप्रकरणी चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्यांनी हे वक्तव्य केले आहे.

३१ डिसेंबरच्या अपप्रकारांना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची मोहीम !

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हुपरी (जिल्हा कोल्हापूर), अंबड (जिल्हा जालना), धारावी आणि मुंबई येथे निवेदन देण्यात आले.

पनवेल येथे गोवंश मांसाची वाहतूक करणार्‍या चार धर्मांधांना अटक

राज्यात गोवंशहत्या बंदी असूनही कायद्याची कडक अंमलबजावणी होत नसल्यानेच सर्वत्र गोहत्या होऊन गोमांसाची अवैध वाहतूकही चालू आहे !

मालवण येथे स्कूबा व्यावसायिकांवर बंदर विभागाची धडक कारवाई

मालवण सागरी किनारपट्टीवर समुद्रात बंदर विभागाने मंगळवार, ‘जलक्रीडा’ (स्कूबा) व्यावसायिकांवर धडक कारवाई केली. या वेळी १२ व्यावसायिकांचे १२ सिलेंडर बंदर अधिकार्‍यांनी कह्यात घेतले आहेत

आंगणेवाडी (तालुका मालवण) येथील श्री देवी भराडीमातेची यात्रा ६ मार्चला

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीमातेची यात्रा या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर मर्यादित स्वरूपात केवळ आंगणे कुटुंबियांच्या उपस्थितीत करण्यात येईल.

३१ डिसेंबर साजरा करून १ दिवसाचे मानसिक धर्मांतर करू नका ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

३१ डिसेंबर साजरा करणे ही हिंदू संस्कृती नाही. मद्याच्या नशेत धुंद होऊन नाचणे, ‘रेव्ह पार्ट्या’ करणे, अशा कृती या दिवशी सर्रास केल्या जातात. या रात्री मद्यधुंद झाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतात, तसेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही वाढते.

३१ डिसेंबरला महाबळेश्‍वर आणि पाचगणीतील सर्व कार्यक्रमांना रात्री १० नंतर प्रतिबंध

कोरोनाच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहाण्यासाठी महाबळेश्‍वर आणि पाचगणी या ठिकाणी ३१ डिसेंबरच्या सर्व कार्यक्रमांना रात्री १० वाजल्यानंतर चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

निवृत्ती महाराज वक्ते यांचे संपूर्ण जीवन अंतर्बाह्य पवित्र होते ! – ह.भ.प. (डॉ.) जयवंत बोधले महाराज

पंढरपूर येथे पू. निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांच्या अस्थीकलशाचे पूजन