मालवण – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीमातेची यात्रा शनिवार, ६ मार्च २०२१ या दिवशी होणार आहे. या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरूपात केवळ आंगणेवाडी येथील आंगणे कुटुंबियांच्या उपस्थितीत यात्रा करण्यात येईल, अशी माहिती आंगणे कुटुंबियांकडून देण्यात आली. ‘कोरोना महामारीमुळे भाविकांच्या होणार्या असुविधेविषयी आम्ही क्षमाप्रार्थी आहोत. भाविकांना नम्र विनंती आहे की, ज्या ठिकाणी तुम्ही आहात, त्या ठिकाणाहून श्री देवी भराडीमातेस नमस्कार करावा आणि आपले सांगणे सांगावे. आई भराडीमाता आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल’, असे आवाहन आंगणे कुटुंबियांनी केले आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > आंगणेवाडी (तालुका मालवण) येथील श्री देवी भराडीमातेची यात्रा ६ मार्चला
आंगणेवाडी (तालुका मालवण) येथील श्री देवी भराडीमातेची यात्रा ६ मार्चला
नूतन लेख
- ईदसाठीही ध्वनीक्षेपक वापरणे हानीकारक ! – मुंबई उच्च न्यायालय
- ५ सहस्र स्वामीभक्तांचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !
- मालवण येथील समुद्रात कर्नाटक राज्यातील अतीजलद नौकांद्वारे अवैधरित्या मासेमारी
- गोमंतक मंदिर महासंघाच्या वतीने पणजी येथे आज आंदोलन
- चौकुळ गावातील अनेक वर्षांचा भूमी वाटपाविषयीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार
- गणेशभक्तांनो, गणेशोत्सवात चित्रपटातील अश्लील गाण्यांवर नृत्य केल्याने होणारी हानी जाणा आणि भजन अन् अभंग आदी नृत्य प्रकार सादर करून ईश्वरी आनंद मिळवा !