राज्यात गोवंशहत्या बंदी असूनही कायद्याची कडक अंमलबजावणी होत नसल्यानेच सर्वत्र गोहत्या होऊन गोमांसाची अवैध वाहतूकही चालू आहे !
मुंबई – माणगाव येथून गोवंडीला १ सहस्र ४०० किलो गायी आणि बैल यांच्या मांसाची अवैधरित्या वाहतूक करणार्या ४ धर्मांधांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. ११ डिसेंबर या दिवशी पनवेल खारपाडा पथकर नाका येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
प्राणीप्रेमी चेतन शर्मा यांना माणगाव येथून गोवंडीला गायी आणि बैल यांच्या मांसाची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी याविषयी पनवेल पोलीस ठाण्यात ही माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी खारपाडा पथकर नाका येथे सापळा रचून वरील गाडी कह्यात घेऊन पडताळणी केली असता पोलिसांना या गाडीत १ सहस्र ४०० किलो गायी आणि बैल यांचे मांस आढळून आले.
अवैधरित्या या मांसाची वाहतूक करण्यात येत असल्याचे उघड झाले. अशाच प्रकरणात दोन वेळा गुन्हे नोंद असलेल्या माणगाव येथील एका कासायानेच हे मांस गोवंडी येथे पाठवल्याचे उघड होताच पोलिसांनी चालकासह चौघांना अटक केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील मुख्य सूत्रधार असलेल्या वरील कसायला अटक होऊ नये म्हणून काही राजकीय पक्षांकडून दबाव आणला होता; मात्र पोलिसांनी खंबीर भूमिका घेत, अखेर या कसायला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बडगुजर यांनी दिली.