प्रदूषण नियंत्रण मंडळाला कायद्याची बाराखडीही ठाऊक नाही ! – कर्नाटक उच्च न्यायालयाने फटकारले
ध्वनीवर्धकातून निर्धारित डेसिबलपेक्षा अधिक प्रमाणात ध्वनी येत असल्याच्या प्रकरणी आरोपीच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई न केल्याने कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि अधिकारी यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने फटकारले आहे.