बेळगाव, ३० नोव्हेंबर – आम्ही हिंदु समुदायातील कोणत्याही व्यक्तीला निवडणुकीचे तिकीट देऊ शकतो. कुरुबा, लिंगायत, वोक्कलिगा किंवा ब्राह्मण समाजातील कोणत्याही व्यक्तीला तिकीट देऊ; मात्र एक गोष्ट नक्की आहे की मुसलमानांना आम्ही तिकीट देणार नाही, असे प्रतिपादन कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री (भाजप) के.एस्. ईश्वरप्पा यांनी केले आहे. कर्नाटकमधील बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. त्या संदर्भात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
के.एस्. ईश्वरप्पा पुढे म्हणाले, ‘‘बेळगाव हे हिंदूंचे केंद्र असून त्याचे समर्थन करणार्यालाच तिकीट दिले जाईल. लोकांचा विश्वास जिंकून विजय मिळवू शकणार्या उमेदवाराचीच राज्यातील आणि राष्ट्रीय पातळीवरील नेते निवड करतील. भाजप वगळता कोणत्याही पक्षामध्ये लोकशाही नाही.’’