गुंटूर (आंध्रप्रदेश) येथील ‘जिना टॉवर सेंटर’चे नाव पालटण्यासाठी भाजपकडून मोर्चा काढण्याचा प्रयत्न !

देशाच्या फाळणीला आणि १० लाख हिंदूंच्या हत्याकांडाला उत्तरदायी असणार्‍या जिनाचे नाव या देशात चालते, हे देशवासियांना लज्जास्पद !

५ लाख रुपयांहून अल्प वार्षिक उत्पन्न असणारी सर्व मंदिरे पुजार्‍यांकडे सोपवावीत !

सर्वोच्च न्यायालयाने वर्ष १९७७ मध्ये निर्देश दिले आणि त्यावर वर्ष २००७ मध्ये, म्हणजे ३० वर्षांनी आदेश देणारे शासनकर्ते आणि प्रशासन हिंदुद्वेषीच ! न्यायालयाने आदेश देऊनही त्याची कार्यवाही होत नसेल, तर असे सरकार आणि प्रशासन काय कामाचे ?

तिघा आय.ए.एस्. अधिकार्‍यांना १ मासाच्या कारावासची शिक्षा !

आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करणे आणि समयमर्यादेत आदेशाचे पालन न करणे, या कारणांवरून तिघा आय.ए.एस्. अधिकार्‍यांना कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली.

नेल्लोर (आंध्रप्रदेश) येथे हनुमान शोभायात्रेवर धर्मांधांनी अवैध मशिदीतून दगड आणि मद्याच्या बाटल्या फेकल्या !

१५ सहस्र हिंदू असतांनाही मूठभर धर्मांध त्यांच्यावर दगडफेक करण्यास धजावतात आणि हिंदू मार खातात, हे हिंदूंना लज्जास्पद !

तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरीमुळे ३ भाविक घायाळ

व्यंकटेश्‍वर मंदिरात १२ एप्रिलच्या दुपारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यात ३ भाविक घायळ झाले.

मुसलमान सरकारी कर्मचार्‍यांना रमझानच्या काळात कार्यालयीन वेळेच्या एक घंटापूर्वीच घरी जाण्याची अनुमती !

जनतेच्या पैशांतून सरकारी कर्मचार्‍यांना वेतन दिले जाते. त्यातूनही एक मास प्रतिदिन १ घंटा मुसलमान कर्मचारी अल्प काम करणार असतील, तर सरकारने त्यांच्या वेतनातून त्याचे पैसे कापले पाहिजेत !

भक्तांना मंदिराच्या व्यवस्थापनाविषयी मत मांडण्याचा पूर्ण अधिकार ! – आंध्रप्रदेश उच्च न्यायालय

राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील श्री महाकाली अम्मावरी मंदिराच्या प्रस्तावित पुनर्निर्माणाच्या विरोधात येल्लंती रेणुका यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हे मत व्यक्त केले.

गंगावरम् येथे राममंदिरात घुसून धर्मांध ख्रिस्त्यांनी केली येशूला प्रार्थना !

ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आंध्रप्रदेशात ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी मोकळे रान मिळाल्याचे आरोप वारंवार होत आले आहेत. अशात त्यांच्याच पोलिसांकडून ‘अशी घटना घडलीच नाही’, असे म्हणत दावे फेटाळण्यात येणे, यात काय आश्‍चर्य ?

विशाखापट्टणम् येथील सनातन धर्म चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रामजन्मभूमीचा खटला लढणारे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता के. परासरन् यांना देण्यात आला पुरस्कार !

रामजन्मभूमीचा खटला लढून तो आम्ही जिंकणे, ही ईश्वराची योजना होती आणि मी त्याच्या चरणी सेवा करत होतो. रामजन्मभूमीचा खटला लढणे, हे कार्य एका व्यक्तीचे नाही, तर ते सांघिक कार्य होते. या खटल्यात मला साहाय्य करणार्‍या अधिवक्त्यांचा चमू हा रामायणातील वानर सेनेसारखा असून त्यांनी त्यांच्याप्रमाणेच सेवा केली आहे.

हिंदुत्वनिष्ठांचा राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी संघटितपणे कार्य करण्याचा संकल्प !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाग्यनगर (आंध्रप्रदेश) येथे षष्टम् राज्यस्तरीय हिंदू अधिवेशन पार पडले !