रेल्वेचालकाने सिग्नल न पाळल्याने झाला अपघात !
अमरावती (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेशातील विजयनगरम् जिल्ह्यातील अलमांडा-कंटकपल्ली या दरम्यान २९ ऑक्टोबरला झालेल्या अपघातात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० जण घायाळ झाले आहेत. येथे विशाखापट्टणम्-पलासा पॅसेंजर या गाडीला विशाखापट्टणम्-रायगडा पॅसेंजर या गाडीने मागून धडक दिली. याविषयी अधिकारी विश्वजीत साहू यांनी सांगितले की, हा अपघात मानवी चुकांमुळे झाला. मागून येणार्या विशाखापट्टणम्-रायगडा पॅसेंजर रेल्वे गाडीच्या चालकाने लाल सिग्नल ओलांडल्यामुळे ही धडक झाली. यामुळे एका गाडीचे ३ आणि दुसर्या गाडीचे २ डबे रुळावरून घसरले.
#WATCH | Drone visuals of the train collision in Vizianagaram, Andhra Pradesh. Rescue operations underway pic.twitter.com/ou24l03HP1
— ANI (@ANI) October 30, 2023
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, केंद्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये, घायाळांना २ लाख रुपये आणि किरकोळ घायाळ झालेल्यांना ५० सहस्र रुपयांची हानीभरपाई घोषित केली आहे. दुसरीकडे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि राज्यातील घायाळांना प्रत्येकी २ लाख रुपये साहाय्य देण्याचे घोषित केले आहे.
All injured shifted to hospitals.
Ex-gratia compensation disbursement started – ₹10 Lakh in case of death,
₹2.5 Lakh towards grievous and ₹50,000 for minor injuries.— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) October 29, 2023