Ayodhya Rammandir Consecration : श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी तिरुपति मंदिराकडून १ लाख लाडू अर्पण !

प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम सनातन धर्मासाठी ऐतिहासिक क्षण ! – तिरुपती देवस्थान

तिरुपती (आंध्रप्रदेश) : श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘तिरुमला तिरुपती देवस्थानम् बोर्डा’कडून १ लाख लाडू पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिरुपती बालाजी मंदिरात ज्या लाडवांचा प्रसाद दिला जातो, तेच लाडू अयोध्येला प्रसाद रूपात पाठवण्यत येणार आहेत.

तिरुमला-तिरुपति देवस्थानम् व्यवस्थापनाचे कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी यांनी यासंदर्भात सांगितले की,

१. श्रीराम आणि व्यंकटेश बालाजी दोघेही भगवान विष्णूच्या महत्त्वपूर्ण अवतारांपैकी एक आहेत. यामुळेच अयोध्येत प्राणप्रतिष्ठा समारोहाला येणार्‍या अतीमहनीय व्यक्ती आणि श्रद्धाळू यांच्यासाठी २५ ग्रॅम वजनाचे १ लाख लाडू अर्पण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

२. श्रीराममंदिरात होणारा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम सनातन धर्मासाठी ऐतिहासिक क्षण आहे.

३. आमच्या बोर्डाचा प्राथमिक उद्देश हा हिंदु धर्म आणि त्याची संस्कृती अन् मूल्ये यांचा प्रचार-प्रसार करणे आहे. श्रीरामजन्मभूमीत होणार्‍या पूजेचा आम्हीही एक भाग बनणे, हे आमचे सौभाग्य आहे.

४. तिरुपती देवस्थानात प्रतिदिन १७५ ग्रॅम वजनाचे ४ लाख लाडू, तर २५ ग्रॅम वजनाचे ७५ सहस्र छोटे लाडू बनवले जातात.

५. अयोध्येत भगवान व्यंकटेश्‍वराचे मंदिर बांधण्यात येणार आहे. यासाठी आमचे बोर्ड योगी आदित्यनाथ शासनाच्या अनुमतीची वाट पहात आहे.