इंग्रजी भाषेचा मोह सोडून राजभाषा हिंदी आणि सर्व भारतीय भाषा यांना समृद्ध बनवण्याचा प्रण करूया !

अनेक देशांमध्ये इंग्रजी भाषेला गौण स्थान असून स्थानिक मातृभाषेतूनच सर्वांगीण विकास होऊन त्यांची प्रगती झाल्याचे दिसून येते. त्यामुळे भारतानेही इंग्रजी भाषेचा मोह सोडून मातृभाषेसह राजभाषा हिंदीचा वापर करणे आवश्यक आहे.

उत्तर गोवा किनारपट्टीवरील ५४ अनधिकृत उपाहारगृहे आणि क्लब यांच्यावर कारवाई कधी ? – नागरिकांचा प्रश्न

किनारपट्टीवर उपाहारगृहे आणि क्लब मिळून ५४ अनधिकृत बांधकामे होईपर्यंत उत्तर गोव्याचे प्रशासन काय करत होते ?

हॅलोवीन आणि पितृपक्ष !

मृत्यूनंतरही आपल्या पूर्वजांच्या पुढील गतीचा विचार करायला शिकवणारा आपला हिंदु धर्म कुठे ?, तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला ओळखू नये; म्हणून ‘हॅलोवीन’ला भयावह भुताटकीसारखी वेशभूषा करून फिरणारे पाश्चात्त्य कुठे ?

‘जंक फूड’ !

‘घडीभरचा टाईमपास’ म्हणूनही याकडे पाहिले जाते; मात्र हा ‘टाईमपास’ भविष्यात मोठा धोका निर्माण करतो, हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे. भारतियांनी आता पौष्टिक पदार्थांकडे वळले पाहिजे. यासाठी चळवळही राबवता येऊ शकते.

‘सनबर्न महोत्सव’ यंदा ३ ऐवजी ४ दिवस ! – रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

‘ईडीएम’ महोत्सव युवा पिढीला व्यसनाधीन बनवणारे आणि पाश्चात्य विकृतीचे उदात्तीकरण करणारे आहेत. ‘ईडीएम’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे !

कुठे टेनिसला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून देणारा इंग्लंड आणि कुठे पारंपरिक खेळांना फाटा देणारे भारतीय !

भारतीय प्रशासनाने पारंपरिक खेळांवर योग्य प्रकारे लक्ष पुरवले आणि त्या दृष्टीने शाळेपासूनच मुलांना प्रशिक्षण दिले, तर या खेळांमध्ये  पुष्कळ चांगले प्राविण्य मिळवून ही मुले भारताचा नावलौकिक वाढवू शकतात. ‘विंबल्डन स्पर्धेचा भारताला हाच संदेश आहे’, असे समजायला हवे !

धरण म्हणजे नदीसह शेकडो प्रजातींचे मरण आणि महापुराला आमंत्रण !

ज्या पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करून आपण नद्या संपवत आहोत, आता त्याच पाश्चात्त्यांचे योग्य अनुकरण करून नद्यांना वाहू दिले पाहिजे !

भारतातील युवकांची भयावह दु:स्थिती !

आजच्या बहुसंख्य युवकांसमोर विशिष्ट असे कोणतेच ध्येय किंवा आदर्श नाही. शीड नसलेले जहाज जसे वाऱ्यासमवेत सागरात कुठेही भरकटते, तसाच आजचा युवक आहे. युवकांमधील विकृती वाढत आहेत. ‘हे वेळीच रोखले नाही, तर विकासापेक्षा विनाशच होणार आहे’, हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही !

अल्पवयिनांमधील हिंसकता !

‘आई-वडील मुलाला वळण लावण्यात न्यून पडले असावेत का ? वडिलांचे पिस्तूल घेऊन पुढील कुकर्म करण्याचे धाडस त्याच्यात आले तरी कुठून ? मृतदेहासमवेत ३ दिवस बसण्याइतका तो निष्ठूर आणि निर्दयी कशामुळे झाला असेल ?’, असे अनेक प्रश्न अनुत्तरितच रहातात. त्याची उत्तरे ना समाजाकडे आहेत, ना सरकारकडे !

‘ऑनलाईन’ जुगार थांबवा !

‘भरघोस आर्थिक उत्पन्नासाठी राष्ट्र रसातळाला गेले तरी चालेल’, ही वृत्ती सध्या जोर धरत आहे. त्यामुळे सरकारने ऑनलाईन जुगार थांबवण्याविषयी योग्य ती कठोर पावले उचलायला हवीत, अन्यथा जुगारामुळे होणारे सामाजिक दुष्परिणाम भयावह असून त्यामुळे राष्ट्राची सर्व प्रकारे हानी होऊ शकते. असे झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ?