संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यनगरीत आगमन

पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने अलंकापुरी आणि देहू येथून निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज अन् जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे २६ जूनला सायंकाळी पुण्यनगरीत आगमन झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून जगणारा समाज निर्माण करायचा आहे ! – पू. संभाजी भिडेगुरुजी, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदु व्रत घेऊन जगले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जगणारा समाज निर्माण करायचा आहे, असे उद्गार श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी काढले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान

‘हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा’, असा भाव दाटून आलेला वैष्णवजनांचा मेळा आणि विठूरायाच्या स्मरणात देहभान हरपून ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषावर ताल धरणारे विठ्ठलभक्त, अशा भक्तीमय वातावरणात प्रतिवर्षीप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीने २५ जूनला सायंकाळी प्रस्थान ठेवले.

पुणे येथील भक्तीगंगा-शक्तीगंगा कार्यक्रम नियोजनाप्रमाणे उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात होणारच ! – नितीन चौगुले, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, कार्यवाह

छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पंढरपूर येथे जाणार्‍या वारीचे दर्शन घेण्यासाठी जात असत. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. तोच आदर्श समोर ठेवून धारकरी प्रत्येक वारकर्‍यात विठ्ठलाचे रूप बघून त्यांचे दर्शन घेण्यासाठी जातात.

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान

मनामध्ये पांडुरंगाच्या भेटीची आस, मुखी ज्ञानोबा-तुकोबा यांचा जयघोष, हातात भगवी पताका आणि टाळ-मृदुंगांचा ठेका अशा भक्तीमय वातावरणात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २४ जून या दिवशी देऊळवाड्यातून प्रस्थान झाले.

राष्ट्रीय वारकरी परिषद पालखीदरम्यान पुण्यात धारकर्‍यांचे स्वागत करणार भक्ती-शक्ती संगम सोहळा

‘छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे ध्येय समोर ठेवून कार्य करणारे लाखो निर्व्यसनी आणि सदाचारी युवक पू. भिडेगुरुजी यांनी घडवले आहेत.

जिल्ह्यातील १५० गावांतील विठ्ठल मंदिर आणि वारकरी यांच्याशी संपर्क साधणार ! – आनंदराव लाड

शहरापासून ११ किलोमीटरवर असलेल्या प्रतिपंढरपूर नंदवाळ येथे आषाढी वारीच्या निमित्ताने होणार्‍या वारीसाठी मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात आढावा बैठक भावपूर्ण वातावरणात पार पडली.

जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज देहूतून प्रस्थान !

जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी २४ जून या दिवशी देहू येथून प्रस्थान ठेवणार आहे. यासाठी लाखो वारकरी श्रीक्षेत्र देहू येथे आले असून प्रस्थानानंतर पालखीचा प्रथेप्रमाणे इनामदार वाड्यामध्ये मुक्काम असेल.

श्री क्षेत्र पंढरपूर येथील वारकरी महाअधिवेशनाच्या संदर्भात नियोजन बैठक !

आषाढी वारीनिमित्त होणार्‍या वारकरी महाअधिवेशनाच्या संदर्भात १६ जून या दिवशी येथे वारकरी मंडळींची बैठक पार पडली. यात अधिवेशनात घेण्यात येणारे विषय, तसेच वारीच्या संदर्भातील समस्या यांसह अनेक विषयांवर सखोल चर्चा होऊन सर्वानुमते विषय ठरवण्यात आले.

सांगली जिल्हा वारकरी संप्रदाय संघटनेच्या अध्यक्षपदी भिकाजी पाटील यांची निवड !

सांगली जिल्हा वारकरी संप्रदाय संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी नुकत्याच करण्यात आल्या. यात अध्यक्षपदी ह.भ.प. भिकाजी पाटील, उपाध्यक्षपदी ह.भ.प. आनंदराव पाटील, कार्याध्यक्षपदी ह.भ.प. प्रभाकर तांदळे, सचिव ह.भ.प. दशरथ पाटील यांची निवड करण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF