केंद्रीय मंत्री नारायण राणे अलीबाग न्यायालयाकडून दोषमुक्त !

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमानकारक उल्लेख

नारायण राणे (डावीकडे) , उद्धव ठाकरे (उजवीकडे)

रायगड – १७ जानेवारी २०२२ या दिवशी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकण दौर्‍यात महाडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरले होते. अवमानकारक उल्लेख केल्याच्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याने न्यायालयाने नारायण राणे यांना दोषमुक्त केले आहे. हा निर्णय अलीबाग मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी दिला आहे.