मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ‘लाइफलाईन’ आस्थापन यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे केली.
कोरोना महामारीच्या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचे काम ‘अस्तित्वात नसलेल्या’ ‘लाइफलाईन’ या आस्थापनाला दिले. हे कंत्राट दिल्यावर हे आस्थापन अस्तित्वात आले. ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर यांचे हे आस्थापन आहे. सर्व नियम डावलून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पी.एम्.आर्.डी.ए.च्या अधिकार्यांना हे काम दिले होते. याच काळात कोविड सेंटरमध्ये उपचार घेणारे रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या. सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न झाला. कोविड सेंटरमधील तब्बल शंभर रुग्णांची शारीरिक हानी झाली आहे.