राज्यातील राजकारण नव्या वळणावर…?

राज्यातील राजकारण नव्या वळणावर…

मुंबई – गेल्या काही दिवसांतील महाराष्ट्राच्या राजकारणातील घटना पहाता परत एकदा महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण लागते कि काय ? अशी चर्चा रंगू  लागली आहे. हा घटनाक्रम पुढीलप्रमाणे आहे.

१. मागील काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी, जेपीसी आणि मोदी यांची पदवी या ३ सूत्रांसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा वेगळी मते मांडली. वरील तिन्ही सूत्रांवरून महाविकास आघाडीतील या दोन पक्षांची मते वेगळी होत आहेत, हे यावरून सिद्ध झाले. या विषयी शरद पवार यांना विचारले असता, त्यांनी त्यांचे सूत्र कसे योग्य आहे, याचे स्पष्टीकरण माध्यमांना दिले होते.

२. ‘त्यानंतर शरद पवार यांचे महाविकास आघाडीतील ३ पक्षाचे सध्या एकमत आहे आणि ते एकत्र आहेत म्हणजे नेहमी एकत्र असतीलच असे नाही’, अशा अर्थाचे वक्तव्यही केले.

३. अजित पवार दोन दिवसांपूर्वी ‘संपर्कात नाही’ (नॉट रिचेबल) अशा स्थितीत होते. त्यामुळे संशयाचे धुके निर्माण झाले, त्यावर त्यांनी ‘आजारी होतो’, असे स्पष्टीकरण दिले.

४. अजित पवार यांना ईडीच्या कारवाईत सध्या तरी प्रथमदर्शनी गोवण्यात आलेले दिसत नाही.

५. आज अंजली दमानिया यांनी ट्वीट केले आहे की, त्या आज मंत्रालयात गेल्या असता त्यांना माहिती समजली की, १५ आमदार अपात्र ठरणार आहेत आणि अजित पवार हे भाजपसमवेत जाणार आहेत.

६. ११ एप्रिलला उद्धव ठाकरे पवार यांच्या भेटीला गेले होते.

७. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भेटणार होते.