राहुल गांधी यांना समजून घेण्यास शरद पवार न्यून पडले ! – बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

राहुल गांधी यांना पक्षात स्वीकारार्हता असून त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील काँग्रेस पुन्हा संघटित होत आहे.=बाळासाहेब थोरात

देशभरात कोरोनाच्या संदर्भातील सरकारी कामात भ्रष्टाचार झाल्याच्या ४० सहस्र तक्रारी

कोरोनासारख्या संकटात भ्रष्ट भारतीय हे मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्यातही पुढे आहेत, हे लक्षात येते ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

‘फायझर’ने भारताकडे मागितली कोरोनावरील लसीची विक्री करण्याची अनुमती !

अशी मागणी करणारे ‘फायझर’ हे पहिले औषधनिर्मिती करणारे आस्थापन ठरले आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटीश सरकारने तसेच बहारीनमध्येही ही लस वापरण्यास संमती देण्यात आली आहे.

भाग्यनगर महापालिका त्रिशंकू स्थितीत !

भाग्यनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक ५५ जागा तेलंगाणा राष्ट्र समितीला मिळाल्या आहेत, तर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या भाजपला ४८ जागा आणि तिसरा क्रमांक मिळालेल्या एम्.आय.एम्. ला ४४ जागा मिळाल्या आहेत.

तृप्ती देसाई यांना ‘जशास तसे’ उत्तर देऊ ! – शिर्डी ग्रामस्थ

भारतीय परंपरा आचरणात आणण्यासाठी संघटितपणे कृतीशील भूमिका घेणारे शिर्डी येथील ग्रामस्थ आणि सामाजिक संघटना यांचे अभिनंदन !

काही आठवड्यांत कोरोना लसीचे संशोधन पूर्ण होईल ! – पंतप्रधान मोदी

सध्या जगभरात विविध आस्थापने कोरोनावरील लस वितरित करतांना दिसत आहेत. त्या लसींची किंमत तुलनेने अधिक आहे. सर्व जग सध्या वाजवी दरातील परिणामकारक लसीची वाट पहात आहे. त्यामुळे जगाचे लक्ष भारतात चालू असलेल्या संशोधनाकडेही आहे.

ब्रिटनमध्ये जाऊन कोरोना लस घेण्यासाठी भारतियांची ट्रॅव्हल एजंट्सकडे चौकशी

कोरोनाची लस भारतात मिळण्यासाठी अद्याप काही मास लागणार आहेत; मात्र ब्रिटन आणि रशिया यांनी लसीकरणाला मान्यता दिली असून ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून लोकांना लस देण्यात येणार आहे. ही लस टोचून घेण्यासाठी भारतियांना ब्रिटनमध्ये जायचे आहे.

कोरोनाविषयीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना कोविड सेंटरमध्ये काम करण्याच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

एकीकडे सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करते आणि दुसरीकडे त्याला प्रतिसाद न देता नियमभंग करणार्‍यांना शिक्षा करण्यालाही विरोध करते, हे हास्यास्पदच होय !

कोरोना नियमांचा भंग करणाऱ्यांना कोविड सेंटर मध्ये काम करण्याची शिक्षा द्या ! – गुजरात उच्च न्यायालय

दंड स्वरूपात पैसे भरून सुटका करून घेतात त्यामुळे लोकांमध्ये शिस्त येत नसल्याने अशी शिक्षा करणेच आता अपरिहार्य ठरते !

गोव्यात दिवसभरात ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू

गोव्यात दिवसभरात ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, तर दिवसभरात केलेल्या २ सहस्र ३ चाचण्यांमध्ये ११७ कोरोनाबाधित आढळले आहेत.