
मुंबई – लोकसभा सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजनेचा निधी कोरोनाच्या विरोधात लढा देण्याकडे वळवण्याच्या केंद्रशासनाच्या निर्णयाला आव्हान देणार्या व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘सद्यस्थितीमध्ये विकासकामांपेक्षा कोरोनाशी लढण्याला प्राधान्य दिले पाहिजे’, असे नमूद करत न्यायालयाने शासनाचा निर्णय योग्य ठरवून ही याचिका फेटाळून लावली आहे.
योजना तात्पुरती निलंबित केल्यामुळे राजकीय कारकीर्दीवर विपरित परिणाम होईल, हे ठाऊक असूनही कोणतेही खासदार किंवा विरोधक यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला नाही. असे केल्यास नागरिकांचे हित धोक्यात येईल, हे त्यांना ठाऊक आहे. आपत्कालीन स्थितीत नागरिकांचे संरक्षण आणि त्यांना साहाय्य करणे यांसाठी शासनाला निधीची आवश्यकता असते. अशा वेळी एखाद्या योजनेतून मिळणारे लाभ सर्वकाळ चालू ठेवा, असे सांगण्याचा अधिकार नागरिकांना नाही, असे निरीक्षण या प्रकरणी न्यायालयाने नोंदवले आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद