तृप्ती देसाई यांना ‘जशास तसे’ उत्तर देऊ ! – शिर्डी ग्रामस्थ

भारतीय परंपरा आचरणात आणण्यासाठी संघटितपणे कृतीशील भूमिका घेणारे शिर्डी येथील ग्रामस्थ आणि सामाजिक संघटना यांचे अभिनंदन !

काही आठवड्यांत कोरोना लसीचे संशोधन पूर्ण होईल ! – पंतप्रधान मोदी

सध्या जगभरात विविध आस्थापने कोरोनावरील लस वितरित करतांना दिसत आहेत. त्या लसींची किंमत तुलनेने अधिक आहे. सर्व जग सध्या वाजवी दरातील परिणामकारक लसीची वाट पहात आहे. त्यामुळे जगाचे लक्ष भारतात चालू असलेल्या संशोधनाकडेही आहे.

ब्रिटनमध्ये जाऊन कोरोना लस घेण्यासाठी भारतियांची ट्रॅव्हल एजंट्सकडे चौकशी

कोरोनाची लस भारतात मिळण्यासाठी अद्याप काही मास लागणार आहेत; मात्र ब्रिटन आणि रशिया यांनी लसीकरणाला मान्यता दिली असून ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून लोकांना लस देण्यात येणार आहे. ही लस टोचून घेण्यासाठी भारतियांना ब्रिटनमध्ये जायचे आहे.

कोरोनाविषयीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना कोविड सेंटरमध्ये काम करण्याच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

एकीकडे सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करते आणि दुसरीकडे त्याला प्रतिसाद न देता नियमभंग करणार्‍यांना शिक्षा करण्यालाही विरोध करते, हे हास्यास्पदच होय !

कोरोना नियमांचा भंग करणाऱ्यांना कोविड सेंटर मध्ये काम करण्याची शिक्षा द्या ! – गुजरात उच्च न्यायालय

दंड स्वरूपात पैसे भरून सुटका करून घेतात त्यामुळे लोकांमध्ये शिस्त येत नसल्याने अशी शिक्षा करणेच आता अपरिहार्य ठरते !

गोव्यात दिवसभरात ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू

गोव्यात दिवसभरात ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, तर दिवसभरात केलेल्या २ सहस्र ३ चाचण्यांमध्ये ११७ कोरोनाबाधित आढळले आहेत.

‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे शरिरावर गंभीर परिणाम झाल्याने वितरण थांबवण्याची चेन्नईच्या स्वयंसेवकाची मागणी

एका ४० वर्षीय स्वयंसेवकाने कोव्हिशिल्ड लसीच्या चाचण्या, उत्पादन आणि वितरण तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे.

आयुर्वेद औषध ‘आयुष-६४’च्या क्लिनिकल चाचणीमध्ये ७० टक्के रुग्ण कोरोनामुक्त

कोरोनाबाधितांवर आयुर्वेदाचे औषध असणार्‍या ‘आयुष-६४’चे परिणाम समोर आले आहेत. ३० पैकी २१ म्हणजे ७० टक्के रुग्ण ५ दिवसांनंतर कोरोनामुक्त झाले. ही चाचणी जयपूर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेकडून करण्यात आली.

श्रीलंकेतील कारागृहातील हिंसाचारात ८ कैद्यांचा मृत्यू, तर ३७ जण घायाळ

काही कैद्यांनी कारागृहामधून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर कारागृह प्रशासनाला त्यांच्या विरोधात बळाचा वापर केल्यावर ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोक मास्कच योग्य पद्धतीने घालत नसतील, तर दिशानिर्देशांचा काय लाभ ? – सर्वोच्च न्यायालय

‘‘केवळ दिशानिर्देश ठरवून चालणार नाही, त्यांची कार्यवाहीही आवश्यक आहे. यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा.’’ हे न्यायालयाला का सांगावे लागते ? केंद्र सरकारला ते कळत का नाही ? कि ‘दिशानिर्देश दिले की, आपले काम संपले’, असे सरकारला वाटते ?