सातारा, १४ डिसेंबर (वार्ता.) – केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात सातारा शहर शिवसेनेच्या वतीने शिवतीर्थावर निदर्शने करण्यात आली. गत एक मासापासून केंद्र सरकार छुप्या पद्धतीने प्रतिदिन पेट्रोल आणि डिझेल यांचे मूल्य वाढवत आहे. याच एका मासात ५ ते ६ रुपयांनी इंधनांचे दर वाढले आहेत. कोरोनामुळे आधीच सर्व नागरिक डबघाईला आले आहेत. त्यातच ही इंधन दरवाढ नागरिकांना न पेलवणारी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने पेट्रोल, डिझेल आणि गॅस यांवरील दरवाढ तातडीने अल्प करावी अन् सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली. शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख निमिष शहा यांनी या वेळी सायकलीवर निदर्शने करून केंद्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला.
या वेळी सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, तालुकाप्रमुख अतिश ननावरे, माजी शहरप्रमुख अधिवक्ता शिरिष दिवाकर, उपशहरप्रमुख मारुति वाघमारे आणि सयाजी शिंदे, महिला संघटक सौ. मीनल शहा आदी मान्यवर आणि २० हून अधिक शिवसैनिक उपस्थित होते.