गोवा शासन केंद्राकडे ध्वनीप्रदूषण नियमात शिथिलता देण्याची मागणी करणार !

ही शिथिलता घेतांना किनारपट्टी भागात रात्री उशिरापर्यंत कानठळ्या बसवणारे संगीत वाजवले जाणार नाही, हे पहावे !

राज्‍यातील संरक्षित स्‍मारकांच्‍या संवर्धनासाठी ३ टक्‍के निधीची तरतूद !

राज्‍यात ऐतिहासिक, पुरातन स्‍मारकांपैकी २८८ स्‍मारके केंद्र सरकारच्‍या भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण या संस्‍थेने राष्‍ट्रीय महत्त्वाची म्‍हणून संरक्षित केली आहेत. राज्‍याच्‍या पुरातत्‍व विभागाकडून ३८६ स्‍मारके संरक्षित म्‍हणून घोषित केली आहेत.

जगातील ५० कोटी बौद्धांना आकर्षित करण्यासाठी जागतिक बौद्ध स्थळांच्या धर्तीवर देशात उभारण्यात येणार ‘बुद्धिस्ट सर्किट्स’ !

गौतम बौद्ध यांचे कार्य प्रामुख्याने भारतात झालेले असतांनाही  जगभरातील ५० कोटी बौद्ध धर्मियांपैकी केवळ ०.००५ टक्के बौद्धच भारतात त्यांच्या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी येतात. त्यामुळे बौद्धांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन मंत्रालय त्याच्या धोरणात मोठा पालट करणार आहे.

गोवा : पर्यटक आणि ट्रेकर्स यांना दूधसागर धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास बंदी !

गेल्या काही दिवसांत दूधसागर धबधब्याच्या पाण्यात पर्यटक वाहून गेल्याच्या, तसेच पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडू नये; म्हणून प्रशासनाने घातली दूधसागर परिसरात जाण्यास पर्यटकांना बंदी !

मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी वस्त्रसंहिता आवश्यक !

मंदिरात दर्शनासाठी येणारे हिंदू, तसेच पर्यटक यांची वेशभूषा पहाता मंदिराच्या चैतन्याचा त्यांना लाभ होण्याला आणि मंदिराच्या सात्त्विकतेला बाधा येते. त्यामुळे मंदिरांसाठी वस्त्रसंहिता फलक लावणे आवश्यक आहे.

श्रीराममंदिराच्या उभारणीसह अयोध्येतील अन्य ३७ धार्मिक स्थळांच्या विकासासाठी राज्यशासनाने दिले ३४ कोटी रुपये !

अयोध्यानगरीत श्रीराममंदिराच्या उभारणीसह तीर्थक्षेत्रातील अन्य ३७ धार्मिक स्थळेही विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ शासनाने ३४ कोटी ५५ लाख रुपये दिले आहेत.

गोव्यात अल्प धोका असलेले १४ धबधबे पर्यटकांसाठी आजपासूनच खुले  !

ज्यात धबधबे, चिरेखाणी आणि अन्य ठिकाणी मिळून मागील सुमारे दीड मासांत २० जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर एका धबधब्याच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेनंतर शासनाने राज्यातील सर्व धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास नागरिकांना बंदी घातली होती.

सोलापूर विद्यापिठात २४ जुलैला होणार ‘पर्यावरण दूत’ धीरज वाटेकर यांचा सन्मान

वाटेकर हे कोकण इतिहास आणि संस्कृती, निसर्ग आणि पर्यावरण, ग्रंथ चळवळ, पर्यटन, आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत आहेत.

गड-दुर्गांचे पावित्र्य जपण्यासाठी धुडगूस घालणार्‍या पर्यटकांना चेतावणी देणार्‍या सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांचे अभिनंदन !

गड–दुर्ग ही पर्यटन स्थळे नव्हेत, तर क्षात्रवीरांची तीर्थस्थळे आहेत, हे लक्षात घ्या. गडांचे पावित्र्य राखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना चेतावणी द्यावी लागते , हे प्रशासनाला लज्जास्पद !

मुंबईतील २ पर्यटकांचा लोणावळ्‍यात बुडून मृत्‍यू, एकाला वाचवण्‍यात यश !

सध्‍या पावसाळा चालू असल्‍याने लोणावळा आणि परिसरात वर्षाविहाराचा आनंद घेण्‍यासाठी ठिकठिकाणी पर्यटक येत आहेत. येथील वरसोली गावामध्‍ये वर्षाविहारासाठी मुंबईतील ३ पर्यटक आले होते.