आपत्तीमध्ये सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री उदय सामंत

अद्यापपर्यंत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. तथापि तो पडणार नाही, असे नाही. संभाव्य पावसाचे प्रमाण लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आपत्कालामध्ये सजग आणि सतर्क रहावे- उदय सामंत

पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ७७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारची अनुमती !

या निधीतून गड-दुर्ग पर्यटन आणि तीर्थस्थळे, सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक,शिवसृष्टी, वढु बुद्रुक येथील स्मारका, अष्टविनायक, श्री क्षेत्र जेजुरी यांचा विकास होणार असून वनपर्यटनाला चालना देण्यासाठी बिबटे सफारी चालू करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

सिंधुदुर्ग : आंबोली धबधबा परिसरात कायदा मोडणार्‍यांवर कारवाई होणार  !

पर्यटकांकडून ‘उपद्रव शुल्क’ वसूल करण्यात येणार आहे. हे शुल्क वसूल करतांना कोणत्याही व्यक्तीने अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर ‘शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणला’; म्हणून फौजदारी गुन्हा नोंद करण्यात येईल.

आध्यात्मिक सौंदर्य आणि समृद्धता अनुभवली नसेल, तर भारताची भेट अपूर्ण राहील ! – मंत्री जी. किशन रेड्डी

आमच्याकडे ५० हून अधिक शक्तीपीठे आहेत, जिथे महिलांच्या दैवी सामर्थ्याची पूजा केली जाते. भारत हे शीख धर्माचे जन्मस्थान आहे आणि आमच्याकडे अमृतसर इथे शीख सुवर्ण मंदिर आहे, जे बंधुत्व आणि समतेचे प्रतीक आहे.

पर्यटकांसाठी वासोटा गड बंद !

जिल्‍ह्यातील घनदाट जंगलराजीत वसलेला दुर्गम वासोटा गड १६ ऑक्‍टोबरपर्यंत पर्यटनासाठी बंद ठेवला आहे. १६ ऑक्‍टोबरनंतर पावसाची स्‍थिती पाहून गड पुन्‍हा चालू करायचा कि नाही याविषयी निर्णय घेण्‍यात येईल. या आदेशाचे उल्लंघन केल्‍यास कारवाई करण्‍यात येईल, अशी माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली. 

टायटॅनिक नौकेचे अवशेष पहाण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी अटलांटिक महासागरात बेपत्ता !

‘टायटॅनिक’ ही महाकाय प्रवासी जहाज अटलांटिक महासागरातील एका हिमनगाला धडकल्याने बुडाले होते. त्याचे अवशेष पहाण्यासाठी लोकांना घेऊन जाणारी पाणबुडी अटलांटिक महासागरात बेपत्ता झाली.

‘एम्.पी.टी.’वर नोव्हेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल ! – डॉ. एम्. बीना

डॉ. एम्. बीना पुढे म्हणाल्या, ‘‘पश्चिम किनार्‍यावरील मुंबई, सिंधुदुर्ग, गोवा, कन्नूर कोझिकोड या मार्गावरील क्रूझ सेवेला नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रारंभ होत आहे. यामुळे पर्यटनाला मोठा वाव मिळणार आहे.’’

गणपतीपुळे येथील समुद्राच्या पाण्यात अचानक वाढ : किनार्‍यावरील दुकानांत शिरले पाणी

बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह पालटले असण्याची शक्यता वर्तवली जात असून मागील २ दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आहे.

गोव्यात ‘होम स्टे’ योजनेला मोठ्या प्रमाणात वाव ! – पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री

गोवा सरकारने ‘गोवा स्टे’ योजनेला चालना देणारे धोरण आखले पाहिजे आणि यामुळे अधिक खर्च करण्याची क्षमता असलेले पर्यटक गोव्यात आकर्षिले जाऊ शकतात.

गोव्यात ३० टक्के शॅक देहलीवाल्यांना अनधिकृतपणे चालवण्यास दिले जातात ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

पर्यटन खात्यातील अधिकारी किंवा एखादी व्यक्ती शॅकधारकांकडून पैसे मागत असल्यास तक्रार का प्रविष्ट केली जात नाही ? एकीकडे पर्यटन खात्यावर आरोप करायचे आणि दुसरीकडे अवैध कृती चालूच ठेवायची, हे चालणार नाही.