लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अयोध्यानगरीत श्रीराममंदिराच्या उभारणीसह तीर्थक्षेत्रातील अन्य ३७ धार्मिक स्थळेही विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ शासनाने ३४ कोटी ५५ लाख रुपये दिले आहेत. यामध्ये अयोध्या, तसेच त्याच्या जवळपास असलेले विविध पौराणिक आणि ऐतिहासिक कुंड, मठ-मंदिरे, आश्रम अन् पर्यटन स्थळे यांचा समावेश आहे.
सिर्फ राममंदिर नहीं अयोध्या के इन 37 धर्मस्थलों का होगा कायाकल्प, आवंटित हुआ बजटhttps://t.co/T4UcsJBBGI#NayaUP #NayaUttarPrades #UttarPradesh #Yogi
— Naya UP (@NayaUttarPrades) July 21, 2023
यासाठी ६८ कोटी ८० लोख रुपये इतका एकूण खर्च होणार असून त्यांतील ३४ कोटी ५५ लाख रुपये मिळाल्याची माहिती अयोध्येचे जिल्हाधिकारी नितीश कुमार यांनी दिली. ‘उत्तरप्रदेश राज्य पर्यटन विकास निगम मर्यादित’कडे याचे काम देण्यात आले आहे. हे सर्व काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला आहे. विकास करण्यात येणार्या धार्मिकस्थळांमध्ये जानकी घाट, दशरथभवन मंदिर, लक्ष्मण किल्ला, ब्रह्म कुंड गुरुद्वारा, सियाराम किल्ला, कौसल्या घाट मंदिर, चित्रगुप्त मंदिर, विश्वकर्मा मंदिर, राम गुलेला मंदिर, वेद मंदिर, महादेव मंदिर, राम पुस्तकालय मंदिर, देवकाली कुंड मंदिर, धन्यानाष्य कुंड मंदिर आदी स्थळांचा समावेश आहे.