मुंबईतील २ पर्यटकांचा लोणावळ्‍यात बुडून मृत्‍यू, एकाला वाचवण्‍यात यश !

प्रतिकात्मक चित्र

लोणावळा (जिल्‍हा पुणे) – सध्‍या पावसाळा चालू असल्‍याने लोणावळा आणि परिसरात वर्षाविहाराचा आनंद घेण्‍यासाठी ठिकठिकाणी पर्यटक येत आहेत. येथील वरसोली गावामध्‍ये वर्षाविहारासाठी मुंबईतील ३ पर्यटक आले होते. पाण्‍यात उतरण्‍याचा मोह न आवरल्‍याने पाण्‍यात पाय घसरून हे पर्यटक बुडाले. त्‍यातील दोघांचा पाय घसरून पाण्‍यात पडल्‍याने मृत्‍यू झाला, तर एकाला वाचवण्‍यात ‘रेस्‍क्‍यू टीम’ला यश आले आहे.