Sant Shri Asharamji Bapu : शिक्षा रहित करण्याची संतश्री पू. आसारामजी बापू यांची मागणी गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली

कथित बलात्काराच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले संतश्री पू. आसारामजी बापू यांनी गुजरात उच्च न्यायालयात शिक्षा रहित करण्याची मागणी केली आहे. ‘या प्रकरणात अनेक वर्षे कारागृहात असल्याने मला झालेली शिक्षा रद्द करावी’, अशी मागणी पू. बापू यांनी न्यायालयात केली

PM Modi : महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणांत न्यायालयाने गतीमानतेने निकाल देणे आवश्यक ! – पंतप्रधान

आज महिलांवरील अत्याचार आणि मुलांची सुरक्षा, हा समाजासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी देशात अनेक कठोर कायदे असून न्यायालयांनी अशा प्रकरणांत गतीमानतेने निकाल दिले पाहिजेत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Patanjali Dant Manjan Non Veg Ingredients : दिव्य दंतमंजनमध्ये मांसाहारी सामग्री असल्याचा दावा करणार्‍या याचिकेवरून ‘पतंजलि’ आस्थापनाला देहली उच्च न्यायालयाची नोटीस

यावर पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला होणार आहे.

Rajasthan High Court : २ पेक्षा अधिक मुले असणार्‍यांना सरकारी नोकरीमध्ये पदोन्नती मिळणार नाही !

तत्कालीन काँग्रेस राज्य सरकारने २ पेक्षा अधिक अपत्य असलेल्या सरकारी कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीवरील बंदी उठवली होती. मुसलमानांना खुश करण्यासाठीच काँग्रेसने हा निर्णय घेतला होता, हे स्पष्ट आहे !

Jagdish Tytler 1984 Delhi Riots : काँग्रेसचे नेते जगदीश टायटलर यांच्यावर वर्ष १९८४ च्या शीखविरोधी दंगलीच्या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवण्यात येणार !

दोषींविरुद्ध गुन्हे नोंद व्हायला ४० वर्षे लागत असतील, तर शिक्षा व्हायला किती वेळ लागेल ? हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

Revealing Identity Minor Rape Victim : बलात्‍कार पीडित मुलीची ओळख उघड करणार्‍या ‘राजस्‍थान पत्रिके’चे प्रकाशक, संपादक आणि पत्रकार यांना १ वर्षाचा कारावास !

आरोपींचे कृत्‍य लैंगिक गुन्‍ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोक्‍सो कायदा), २०१२च्‍या कलम २३  आणि भारतीय दंड संहितेच्‍या कलम २२८(अ) या कलमांचे उल्लंघन करते, असे कनिष्‍ठ न्‍यायालयाने निकालात म्‍हटले आहे.

ध्वनीप्रदूषणाविषयी सर्वांत अधिक तक्रारी आलेल्या हणजूण परिसरातील ५ उपाहारगृहांना उच्च न्यायालयाची नोटीस

ध्वनीप्रदूषणाविषयी सर्वांत अधिक तक्रारी आलेल्या हणजूण परिसरातील ५ उपाहारगृहांना उच्च न्यायालयाने नोटीस जारी केली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने सर्व ५ उपाहारगृहांना पक्षकार ठरवले आहे.

Shashi Tharoor : न्यायालयाने काँग्रेसचे नेते शशी थरूर यांची याचिका फेटाळली !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अवमानकारक विधान केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते तथा खासदार यांच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.

Allahabad HC On Temple Management : धर्मावर श्रद्धा असलेल्‍या व्‍यक्‍तींकडेच मंदिराचे नियंत्रण हवे ! – अलाहाबाद उच्‍च न्‍यायालय

न्‍यायालयाचेही असे मत असतांना मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्‍यासाठी सरकार काय पावले उचलणार ?

Calcutta HC : ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ चित्रपटावर बंदी घालण्यास कोलकाता उच्च न्यायालयाचा नकार !

या चित्रपटात बांगलादेशातून भारतात होणारी मुसलमानांची घुसखोरी, रोहिंग्या निर्वासितांचे संकट, लव्ह जिहाद आणि समाजातील आंतरधर्मीय किंवा आंतरधर्मीय संबंध यांविषयीच्यासत्य घटनांवर आधारित गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.