Shashi Tharoor : न्यायालयाने काँग्रेसचे नेते शशी थरूर यांची याचिका फेटाळली !

पंतप्रधान मोदी यांच्याविषयी अवमानकारक विधान केल्याचे प्रकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते तथा खासदार शशी थरूर

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी( Narendra modi) यांच्याविषयी अवमानकारक विधान केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते तथा खासदार शशी थरूर(Shashi Tharoor) यांच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात(Delhi High Court) याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. यावर थरूर यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट करून या प्रकरणात कार्यवाही रहित करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने थरूर यांची याचिका फेटाळून लावली, तसेच वर्ष २०१९ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणाच्या कार्यवाहीवर आणलेली स्थगितीही उठवली.

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी वर्ष २०१८ मध्ये पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख ‘शिवलिंगावर विंचू’ असा केला होता. यावर भाजपचे नेते राजीव बब्बर यांनी देहली उच्च न्यायालयात थरूर यांच्या विरोधात मानहानीचा खटला प्रविष्ट केला होता.