हिंदूंच्या मोठ्या मंदिरांच्या जवळ ख्रिस्ती मिशनरी धर्मांतराला उत्तेजन देतात ! – चंद्रबाबू नायडू, अध्यक्ष, तेलुगु देसम्  

नायडू यांच्या विधानाला विरोध करत १३ जिल्ह्यांतील तेलुगु देसमच्या नेत्यांची त्यागपत्रे

  • ख्रिस्ती किंवा मुसलमान त्यांच्या धर्माच्या विरोधात कुणीही बोलले, तर ते त्याला विरोध करतात, तर हिंदू स्वतः सहिष्णु असल्याचे दाखवत निष्क्रीय रहातात !
  • ख्रिस्ती आणि मुसलमान नेते प्रथम ‘ख्रिस्ती’ अन् ‘मुसलमान’ असतात आणि नंतर कुठल्याही पक्षाचे नेते, मंत्री किंवा अधिकारी असतात,हेच यावरून दिसून येते !
  • हिंदूंच्या मंदिरांच्या ठिकाणी ख्रिस्ती मिशनर्‍यांचा सुळसुळाट झाला आहे, ही वस्तूस्थिती आहे; मात्र ख्रिस्ती नेते मिशनर्‍यांना त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !
चंद्रबाबू नायडू

विजयवाडा (आंध्रप्रदेश) – ‘ख्रिस्ती मिशनरी राज्यातील मोठ्या मंदिरांच्या जवळपास धर्मांतराला उत्तेजन देत आहेत, असे विधान तेलुगु देसम् पक्षाचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांनी केले. यावरून तेलुगु देसम् पक्षाच्या १३ जिल्ह्यांतील ख्रिस्ती नेत्यांनी विजयवाडा येथे एकत्र येत पक्षाचे त्यागपत्र दिले. त्यांनी नायडू यांच्या विधानावर टीका केली. यापूर्वी नायडू यांच्या या विधानावर ख्रिस्ती संघटनांनी निदर्शने करत क्षमायाचना करण्याची मागणी केली होती.

१. तेलुगु देसम् पक्षाचे नेते फिलिप टोचर यांनी त्यागपत्र देतांना सांगितले की, ही अत्यंत दुःखद घटना आहे की, मी पक्षाचे त्यागपत्र देत आहे. नायडू यांच्या विधानामुळे आमच्या समाजातील लोक प्रश्‍न उपस्थित करत आहेत.

२. विजयवाडा येथील दलित ख्रिस्ती नेते पेरिका वराप्रसाद राव यांनी आरोप केला की, राजकीय अस्तित्व कायम ठेवण्यासाठी नायडू यांनी असे विधान दिले आहे.

३. वर्ष २०१९ च्या निवडणुकीत तेलुगु देसम् पक्षाचे समर्थन करणारे ख्रिस्ती नेते जॉन बेनी लिंगम यांनी कृष्णा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून म्हटले की, चंद्रबाबू नायडू हेच त्यांच्या माणसांना सांगून मंदिरांवर आक्रमण करत आहेत आणि त्यासाठी ख्रिस्त्यांना उत्तरदायी ठरवत आहेत.