नवी मुंबईत स्‍वच्‍छ भारत सर्वेक्षणामुळे ए.पी.एम्.सी. लगतचा परिसर स्‍वच्‍छ !

सर्वेक्षणाचे पथक येणार म्‍हणून स्‍वच्‍छता करण्‍यापेक्षा परिसर कायमच स्‍वच्‍छ रहाण्‍यासाठी प्रशासन प्रयत्न का करत नाही ?

तुम्ही भाजपमध्ये मंत्री असतांना सरकारवर सर्वेक्षणासाठी दबाव का आणला नाहीत ? – मायावती, बहुजन समाज पक्ष

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या ‘हिंदूंची मंदिरे पूर्वी बौद्ध मठ होते आणि त्याचे सर्वेक्षण केले पाहिजे’, या विधानावर मायावती यांचा मौर्य यांना प्रश्‍न !

गोवा : लोकप्रतिनिधींच्या विरोधात साडेपाच वर्षांत १३५ गुन्हे नोंद

गेल्या साडेपाच वर्षांत आजी-माजी आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, पंचसदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात हे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. यामधील ५९ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, तर १६ प्रकरणांचे पोलीस अन्वेषण करत आहेत.

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणावर २७ जुलैला होणार निर्णय

सर्वेक्षणानंतरच मंदिराच्या रचना योग्यरित्या कळू शकतील. भारतीय पुरातत्व विभाग दोन तंत्रांच्या माध्यमातून सर्वेक्षण करत आहे. यामध्ये छायाचित्रण आणि ‘इमेजिंग’ करण्यात येणार आहे.

गेल्या ६ मासांत गोव्यात एक दिवसाआड अमली पदार्थांविषयीच्या गुन्ह्याची नोंद

पोलीस त्यांचे काम व्यवस्थितपणे करत नाहीत. अमली पदार्थांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. पोलिसांच्या सहकार्याविना अमली पदार्थ शहरात येणे शक्यच नाही. पोलीसदेखील या गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आहेत.

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून  २६ जुलैपर्यंत स्थगिती !

सर्वेक्षणाचे हे काम आता स्थगित झाले असले, तरी त्याला पुन्हा अनुमती मिळाल्यास ते चालू करण्यात येणार आहे. केवळ वैज्ञानिक सर्वेक्षण असेल, ते लवकर पूर्ण होऊ शकते; मात्र जर खोदकाम करायचे असल्यास त्याला अधिक काळ लागू शकतो.

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाच्या विरोधात मुसलमान पक्षाची सर्वोच्च न्यायालयात याचिका

जिल्हा न्यायालयाने येत्या ४ ऑगस्टपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. मुसलमान पक्षाने या सर्वेक्षणाला विरोध करतांना ‘प्लेसेस ऑफ वर्शिप १९९१’ या कायद्याचा आधार घेतला आहे.

लोकांच्या कल्याणासाठी अधिकार्‍यांनी तत्परतेने काम करावे ! – पालकमंत्री उदय सामंत

अधिकार्‍यांना अशा सूचना का द्याव्या लागतात ! खरे तर अधिकार्‍यांनी स्वत:च लोकांच्या कल्याणासाठीच कामे करायला हवीत !

ज्ञानवापी परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास न्यायालयाची अनुमती !

वाराणसी येथील ज्ञानवापीच्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने पुरातत्व विभागाला वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची अनुमती दिली आहे. येत्या ४ ऑगस्टपर्यंत वैज्ञानिक सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

६ वर्षांत गोव्यातील ४५ सहस्र लोक दारिद्र्यरेषेबाहेर !

नीती आयोगाने नुकताच ‘राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक : प्रगतीसंबंधी समीक्षा २०२३’ या नावाने अहवाल प्रसिद्ध केला आहे. नीती आयोगाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.