ज्ञानवापी मंदिर सर्वेक्षण ९ व्या दिवशीही चालू : रडार तंत्रज्ञानाद्वारे जमिनीतील सत्य उघडणार

प्रयागराज – भारतीय पुरातत्व खात्याने शनिवार, १२ ऑगस्ट या दिवशी म्हणजे ९ व्या दिवशीही ज्ञानवापी मंदिराचे सर्वेक्षण चालू ठेवले. न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय पुरातत्व खात्याला सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून २ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करायचा आहे.

भारतीय पुरातत्व खाते ‘ग्राऊंड पेनेट्रेटिंग रडार’ (जी.पी.आर्.) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भूमीच्या आतील भागाचे सर्वेक्षणही करत आहे. तळघरातूनही पुरावे गोळा केले जात आहेत. भारतीय पुरातत्व खात्याने ज्ञानवापी मंदिर परिसराचा ‘३ डी’ नकाशाही सिद्ध केला आहे.