देहलीतील इस्लामी धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोना झाल्याच्या शक्यतेवरून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी मुसलमानांच्या ‘तबलीगी जमाती’ने एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात देश आणि विदेश येथून उपस्थित राहिलेले  धर्मगुरु आणि अन्य लोक परत त्यांच्या घरी गेले. यातील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशभरात घरून काम केले जात असल्यामुळे मंदावला इंटरनेटचा वेग !

अनेक जण ‘ऑनलाइन वेबसीरिज्’ आणि ‘ऑनलाइन’ खेळ खेळत असल्याचे उघड : घरून काम करण्याचे प्राधान्य अग्रक्रमात असतांना सरकारने ‘ऑनलाइन वेबसीरिज्’ आणि ‘ऑनलाइन’ खेळ यांवर बंदी आणून कामे पूर्ण होण्यासाठी इंटरनेटला गती उपलब्ध करून द्यावी, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

विवाहबाह्य संबंधांसाठी कुप्रसिद्ध असलेले ‘अ‍ॅप’ डाऊनलोड करण्यात भारतियांचे प्रमाण ७० टक्क्यांनी वाढले !

पाश्‍चात्त्य विकृतीचा आणखी एक दुष्परिणाम ! आज विदेशात कुटुंबव्यवस्था मोडकळीस येऊन त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पाश्‍चात्त्य विकृतीचा दुष्परिणाम जाणून सरकार आणि प्रशासन यांनी अशा ‘अ‍ॅप’वर कायमस्वरूपी बंदी घालायला हवी !

‘ती’ सूची पुढे पाठवल्यास गुन्हा नोंद होणार ! – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

कोरोनाबाधित असा अपप्रचार करून परदेशातून आलेल्या कोल्हापुरातील काही व्यक्तींची सूची सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे पुढे पाठवल्यास गुन्हा नोंद केला जाईल, अशी चेतावणी डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे. जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोचली ५२६ वर

देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५२६ झाली असून आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक म्हणजे १०१ रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून त्यानंतर केरळमध्ये ९५ रुग्ण आढळले आहेत.