बेंगळुरू येथील १६ मशिदींवरील ध्वनीक्षेपकांमुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका

न्यायालयामध्ये यासाठी याचिका का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन यांना ध्वनीप्रदूषण होत असल्याचे लक्षात का येत नाही ? कि ते बहिरे आहेत ?

‘डेसीबल मीटर’ नादुरुस्त झाल्याने ध्वनीप्रदूषण करणार्‍या ‘रेव्ह पार्ट्यां’वर कारवाई करू शकत नाही’, असे म्हणणारे पोलीस असणे, हे लज्जास्पद !

यातून पोलीस खाते एकतर निष्क्रीय आहे किंवा पोलीस अधिकार्‍यांचे रेव्ह पार्ट्या करणार्‍यांशी साटेलोटे आहे, असे वाटल्यास चुकीचे
काय ? ‘डेसीबल मीटर’ नादुरुस्त हे कळूनही तो नवीन का घेतला नाही ? न्यायालयाने यावर कठोर निर्णय घ्यायला हवा !

ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी भारतीय वाद्यांच्या आवाजात ‘हॉर्न’ वाजणार ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

‘ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन’च्या ‘ध्वनीप्रदूषण जागरूकता अभियाना’चे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

(म्हणे) ‘डेसीबल मीटर’ नादुरुस्त झाल्याने पोलीस ध्वनीप्रदूषण करणार्‍या ‘रेव्ह पार्ट्यां’वर कारवाई करू शकत नाही !’- गोवा पोलिसांनी न्यायालयात दिले उत्तर

ही स्थिती गोवा पोलिसांसाठी लज्जास्पद ! असे उत्तर न्यायालयात द्यायला संबंधितांना लाजही कशी वाटली नाही ? असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?

ठाणे येथे १०४ बुलेटच्या सायलेन्सरवर बुलडोझर, तर वाहनांच्या काचेवर काळी फिल्म लावणार्‍यांवर कारवाई !

दुचाकीस्वार त्यांच्या दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये पालट करून कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवतात. त्यामुळे बर्‍याच नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.

मशिदींवरील अवैध भोंग्यांचा प्रश्‍न केवळ ध्वनीप्रदूषणापुरता नसून हिंदूंना हुसकावून लावणारा ‘लॅण्ड जिहाद’ ! – संतोष पाचलग, हिंदुत्वनिष्ठ

अनधिकृत भोंगे हा प्रश्‍न केवळ ध्वनीप्रदूषणापुरता मर्यादित नसून हिंदूंना हुसकावून लावणारा नियोजित जिहाद आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. ध्वनीक्षेपकावरून दिली जाणारी अजान हा एक प्रकारे ‘लॅण्ड जिहाद’ आहे.

मशिदींवरील भोंग्यांमुळे त्रास होत असल्याने न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यास सांगा ! – उत्तरप्रदेशच्या मंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

यापूर्वीच अलाहाबाद केंद्रीय विद्यापिठाच्या कुलगुरूंनीही अशा प्रकारची तक्रार केली होती. राज्यातील जनतेला मशिदींवरील भोंग्यांमुळे त्रास होत असतांना प्रशासन आणि पोलीस बहिरे झाले आहेत का ?

रस्त्यावरील नमाजपठण आणि मशिदींतील भोग्यांवरून होणारी अजान बंद करण्याची मागणी !

केंद्रात आणि देशातील अनेक राज्यांत भाजपचे सरकार असतांना त्यांनी अशा प्रकारची बंदी घातलेली नाही. त्यांनीही अशी बंदी घालावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

कर्नाटक वक्फ बोर्डाकडून मशिदींना ध्वनीक्षेपक न लावण्याविषयी दिलेला आदेश मागे !

भोंग्यांवरून दिल्या जाणार्‍या अजानमुळे लोकांना होणारा त्रास सर्वश्रुत आहे आणि ते धर्मांधांनाही ठाऊक आहे; मात्र ते पोलीस, प्रशासन एवढेच काय, तर सर्वोच्च न्यायालयालाही जुमानत नाहीत

रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत दर्गा आणि मशिदी येथे ध्वनीक्षेपक लावू नका ! – कर्नाटक राज्य वक्फ बोर्डाचे परिपत्रक

नियमाचे पालन दर्गा आणि मशिदी करत नसतील, तर बोर्डाने अशांवर कारवाई करण्यास पोलिसांना सांगितले पाहिजे ! तसेच या नियमांचे पालन न करणारे दर्गे आणि मशिदी यांवर पोलीस कारवाई करत नसतील, अशा बहिर्‍या पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !