मशिदींवरील भोंग्याचा आवाज मोजण्यासाठी ध्वनीमापन यंत्र बसवा !

कर्नाटक पोलिसांकडून मशिदींना नोटीस

  • कर्नाटक उच्च न्यायालयाने वर्ष २००१ मध्ये दिलेल्या आदेशाचे पालन इतक्या वर्षांनी केले जात आहे ! हे जर आधीच केले असते, तर आज समाजाला मशिदींवरील भोंग्यांची समस्या भेडसावली नसती ! – संपादक
  • २१ वर्षांपासून न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणार्‍या पोलिसांना सरकारने बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी राज्यातील मशिदींना नोटीस बजावली आहे. त्यांनी भोंग्यांचा आवाज हा निश्‍चित करण्यात आलेल्या डेसिबल एवढाचा ठेवण्यास सांगितले आहे. तसेच ध्वनीमापन यंत्रणा बसवण्याचेही म्हटले आहे.

१. बेंगळुरू शहरातील २५० हून अधिक मशिदींना अशा प्रकारची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिसीनंतर मशिदींकडून ध्वनीमापन यंत्र लावण्यास चालू करण्यात आले आहे. याद्वारे पोलिसांना भोग्यांचा नेमका आवाज किती आहे, ते कळू शकणार आहे. यासह शहरातील ८३ मंदिरे, २२ चर्च आणि ५९ पब यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

२. राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी राज्याच्या सर्व पोलीस आयुक्त, पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांना धार्मिक स्थळे, पब, नाईट क्लब अन् अन्य ठिकाणी ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भातील नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्याची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

आम्ही कोणताही नवा आदेश दिलेला नाही ! – मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

डावीकडे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

सरकारच्या दृष्टीने सर्वजण समान आहेत. कर्नाटक सरकार कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मशिदींवरील भोंग्यांचा आवाज नियंत्रित करण्याच्या आदेशाचे पालन करत आहे; मात्र हा आदेश बलपूर्वक लागू करता येणार नाही. यासाठी पोलीस ठाण्यांपासून ते जिल्हा स्तरावरील संघटना यांच्याशी चर्चा करण्यात येईल. मुळात हा आदेश वर्ष २००१ आणि २००२ मधील आहे. आम्ही कोणताही नवा आदेश दिलेला नाही. न्यायालयाने डेसिबलचा स्तर कायम ठेवण्यास सांगितलेले आहे. त्यामुळे जिल्हा स्तरावर ध्वनीमापन यंत्र खरेदी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. कोणताही समाज अथवा संघटना यांना कर्नाटकातील शांतता आणि सद्भाव बिघडवण्याची अनुमती देता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(म्हणे) ‘मंदिरांनीही नोटिसीचे पालन करावे ! – इमाम महंमद इम्रान रश्दी

हिंदूंकडून कायद्याचे पालन केले जात असल्याने आतापर्यंत कुणीही हिंदूंच्या मंदिरांवरील भोंग्यांविषयी कधी तक्रार केलेली नाही; मात्र मशिदींवरील भोंग्यांवरून मात्र जनतेला त्रास होत आहे. तरीही अशा प्रकारचे विधान करून हिंदूंनाही दोषी ठरवण्याचा धर्मांधांचा प्रयत्न लक्षात येतो ! – संपादक

बेंगळुरूच्या जामिया मशिदीचे प्रमुख इमाम महंमद इम्रान रश्दी यांनी पोलिसांच्या नोटिसीविषयी म्हटले की, आम्ही आवश्यकतेनुसार आवाज नियंत्रित करणारे उपरकरण लावण्याची व्यवस्था केली आहे, जेणेकरून कोणतीही समस्या उत्पन्न होऊ नये. आम्ही नोटिसीचे पालन करणार आहोत, तसेच मंदिरांनीही करावे.