(म्हणे) ‘२ मिनिटांच्या अजानसाठी मशिदींवरील ध्वनीक्षेपकाचा वाद उकरणे निरर्थक !’ – महंमद हाफीझुर रहेमान, अध्यक्ष, जामा मशीद

मशिदींवरील भोंग्याद्वारे ध्वनीप्रदूषण होऊन त्याचा त्रास नागरिकांना होत असल्याने सर्वाेच्च न्यायालयाने मशिदींवरील भोंगे हटवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे मोहम्मद हाफीझुर रहेमान न्यायालयापेक्षा आपण अधिक शहाणे असल्याचेच दाखवून स्वतःचेच अज्ञान पाजळत आहेत ! – संपादक 

महंमद हाफीझुर रहेमान

नागपूर – आमच्या धर्माची प्रार्थना करतांना आम्ही कोणत्याही नियमांचे उल्लंघन करत नाही. केवळ २-३ मिनिटांच्या अजानसाठीच ध्वनीक्षेपकाचा उपयोग केला जातो. त्यामुळे हा विनाकारण हा वाद उकरून काढणे निरर्थक आहे. मशिदींवरील ध्वनीक्षेपक ध्वनीप्रदूषणाच्या कक्षेत येत नाही, असे विधान जामा मशिदीचे अध्यक्ष मोहम्मद हाफीझुर रहेमान यांनी ७ एप्रिल या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केले.

अजान ही ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून केली जाते. मशिदींवरील ध्वनीक्षेपक ध्वनीप्रदूषण करत आहेत, असा आरोप राजकीय पक्षांकडून होत आहे. त्याअनुषंगाने ते बोलत होते.