
१. ‘साधक, भक्त आणि संत यांचे आपल्याकडून नकळत जरी मन दुखावले गेले, तर देव आपल्याला स्वीकारत नाही.
२. देवाला त्याच्यावर प्रेम करणार्यापेक्षा त्याच्या भक्तांवर किंवा साधकांवर प्रेम करणारा अधिक प्रिय असतो.
३. देव सर्वांमध्ये सूक्ष्मातून आहेच; म्हणून आपण सर्वांमध्ये देवाला पहायला लागलो की, देवही आपल्याकडे पहातो, म्हणजे त्याची आपल्यावर कृपा होते.
४. दुसर्यांमध्ये देवाला पहाता येण्यासाठी आधी स्वतःमध्ये देवाला पहाता यायला हवे.’
– (पू.) संदीप आळशी (२६.१२.२०२४)