सनातनच्या ५८ व्या संत पू. (कै.) श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८८ वर्षे) यांच्या मृत्यूत्तर सूक्ष्मातील प्रवासाचे सुश्री मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
कालच्या लेखात पू. काळेआजी यांनी आयुष्यभर केलेली साधना, त्यांच्या मृत्यूपूर्वीची स्थिती, त्यांचा मृत्यू आणि मृत्यूत्तर स्थिती यांच्या संदर्भातील लेखबद्ध केलेले ईश्वरी ज्ञान आपण पाहिले. आज या लेखामध्ये आपण पू. काळेआजींचा मृत्यूत्तर साधनाप्रवास याच्या संदर्भात झालेले सूक्ष्म परीक्षण येथे लेखबद्ध केले आहे.
सनातनच्या ५८ व्या संत पू. (कै.) श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी यांचा मृत्यू आणि मृत्यूत्तर साधनाप्रवास यांचे सुश्री मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
१३ डिसेंबर २०२४ या दिवशी कै. विजयालक्ष्मी काळेआजी यांची प्रथम पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.
पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांची उत्कट भावाने आणि निरपेक्षपणे सेवा करणारे आदर्श दाते कुटुंबीय !
‘पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी सनातनच्या आश्रमात वास्तव्याला आहेत. त्या गंभीर आजारी आहेत. पू. दातेआजींची सेवा करणार्या दाते कुटुंबियांची गुणवैशिष्ट्ये एका साधिकेच्या लक्षात आली, ती देत आहोत.
आध्यात्मिक स्तरावर राहून साधकांना अविरत मार्गदर्शन करणार्या पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांचा पू. शिवाजी वटकर यांच्याशी झालेला संवादरूपी सत्संग !
संवादाच्या वेळी पू. ताई पुष्कळ स्थिरतेने, सहजतेने, नम्रतेने (प्रत्येक वेळी त्यांनी पू. काका म्हणणे) आणि अनुसंधानात राहून बोलत होत्या. ‘त्यांचा प्रत्येक शब्द ऐकतांना देवच माझ्याशी प्रत्यक्ष बोलत आहे’, असे मला वाटले. त्या स्वतःविषयी काही सांगत नसून ‘देव त्यांच्याकडून दैवी कार्य कसे करवून घेत आहे’, याविषयी सांगत होत्या.
विविध त्रासदायक चेहरे उमटवण्याच्या माध्यमातून पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्यावर मोठ्या वाईट शक्तींनी केलेली आक्रमणे !
एकदा एक फळ खाऊन झाल्यानंतर माझा उष्टा हात चुकून भिंतीला लागला. तेव्हा ‘काटेरी डोके असलेल्या मोठ्या वाईट शक्तीचा चेहरा भिंतीवर उमटला आहे’, असे थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले.
पू. संदीपदादा, द्यावा आशिष आम्हा ‘सक्षम’ होण्याचा ।
मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी (५.१२.२०२४) या दिवशी पू. संदीप आळशी यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकाने त्यांच्याप्रती व्यक्त केलेली काव्यरूपी कृतज्ञता पुढे दिली आहे.
‘साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, यासाठी त्यांना सर्वतोपरी साहाय्य करणारे सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी !
‘मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी (५.१२.२०२४) या दिवशी सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला घडलेले त्यांच्यातील गुणांचे दर्शन येथे दिले आहे.
प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेमुळे साधकांना विविध विषयांवर ज्ञान स्फुरणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कृपेमुळे केवळ मलाच नव्हे, तर सनातनच्या बर्याच साधकांना अध्यात्म, साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे लिखाण आपोआप सुचत आहे. साधकांना येणार्या या अनुभूतीमुळे ‘कर्ता मी नसून गुरु आहेत’ हा भाव साधकांमध्ये निर्माण झाल्याने त्यांचा अहंभाव नष्ट होऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती शीघ्रतेने होत आहे.