‘संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे, ‘सुख पाहतां जवापाडें । दु:ख पर्वताएवढें ।।’ मी व्यवहारात असतांना मला असाच अनुभव पावलोपावली येत होता. मागील ३४ वर्षे मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपाछत्राखाली साधनेचा प्रवास करत आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी माझ्याकडून साधना करवून घेऊन माझी प्रगतीही केली आहे. या साधना प्रवासात गुरुदेवांनी मला दुःखापेक्षा आनंदच अधिक दिला आहे. माझ्या जीवनात प्रारब्धानुसार जे दुःख येत आहे, ते सहन करण्याची शक्तीही गुरुदेव मला देत आहेत. त्यामुळे माझा ‘साधना प्रवास आणि माझे जीवन पुष्कळ आनंददायी आहे,’ याची मला जाणीव होते. त्या विषयीचे कवितारूपी पुष्प मी गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावाने अर्पण करतो.

साधनेतच आनंद आहे फार ।
संसार सागरात दुःख असे अपार ।
गुरुदेव (टीप १) शक्ती देती, मात करण्या त्यावर ।
साधनेतच आनंद आहे फार ।। १ ।।

साधनेत येती अडचणी अनंत ।
गुरुदेव करून घेतील त्यावर मात ।
साधनेतच आनंद आहे फार ।। २ ।।
मायेत कुणी कुणाचे नसते ।
साधनेत गुरुदेवांविना आपले कुणीच नसते ।
साधनेतच आनंद आहे फार ।। ३ ।।
त्रास (टीप २) कितीही झाला तरी ।
गुरुदेवांच्या कृपेने लढूया त्रासाशी ।। ४ ।।
नको हेवा, नको मत्सर, नको कुणाचा द्वेष ।
गुरुकृपेने निरपेक्ष प्रेम करूया सर्वांवर ।
साधनेतच आनंद आहे फार ।। ५ ।।
गुरुकृपेच्या छत्राखाली साधना करूया ।
ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करूया ।
साधनेतच आनंद आहे फार ।। ६ ।।
गुरुचरणी राहूया, साधनेसाठी जगूया ।
चेहर्यावर आनंद अन् प्रसन्नता ठेवूया ।
साधनेतच आनंद आहे फार ।। ७ ।।
टीप १ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
टीप २ : अनिष्ट शक्तींमुळे होणारे आध्यात्मिक त्रास आणि स्वभावदोषांमुळे होणारे मानसिक त्रास
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.७.२०२३)
|