कोटीशः प्रणाम !

• आज तुकारामबीज
• प.पू. साटम महाराज, दाणोली, सिंधुदुर्ग यांची आज पुण्यतिथी
• मुंबई येथील प.पू. भाऊ करंदीकर यांची आज पुण्यतिथी
• अमरावती येथील सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा आज वाढदिवस !

संत तुकाराम महाराज यांनी विमानाद्वारे सदेह वैकुंठगमन केल्याचे पौराणिक संदर्भ

काही नास्तिक लोक हिंदु धर्माचे सर्व ग्रंथ खोटे ठरवून तर्काने ‘तुकाराम महाराजांचा खून झाला’, असे सांगत सुटले आहेत; पण तुकाराम महाराजांचा खून झाला नसून सदेह वैकुंठगमनच झाले….

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांतून (पावलांतून) पुष्कळ प्रमाणात, तर त्यांच्या उजव्या चरणाच्या अंगठ्यातून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

हिंदु धर्मात संतांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा व्यक्ती संतांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करते, तेव्हा तिला संतांच्या चरणांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करता येते. यातून हिंदु धर्मात प्रत्येक कृतीला अध्यात्मशास्त्रीय आधार आहे, हे लक्षात येते.

कुंभमेळ्यातील संतांच्या व्यवस्थेसाठी विशेष समितीची स्थापना ! – बंशीधर भगत, शहरविकास मंत्री, उत्तराखंड

कुंभमेळ्यामध्ये येणार्‍या संतांची चांगल्या प्रकारे व्यवस्था व्हावी, यासाठी विशेष समिती बनवण्यात आल्याचे शहरविकास मंत्री बंशीधर भगत यांनी घोषित केले.

विश्‍व हिंदु परिषद देशातील ४ लाख मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात अभियान राबवणार !

विहिंपचे हे स्तुत्य अभियान आहे. असे असले, तरी केंद्र सरकारने आणि भाजप शासित राज्यांनीच मंदिरांचे सरकारीकरण रोखण्यासाठी कायदा केला पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

दान कसे असावे ?

‘देश, काल आणि पात्र पाहून, तसेच सत्कारपूर्वक, शुद्ध बुद्धीपुरस्सर अन् प्रतिफळाची आशा न धरता दिलेले दानच खरे दान आणि तेच गृहस्थाचे मोठे तप होय.’

बदायू (उत्तरप्रदेश) येथे साधूंची अमानुषपणे हत्या करून त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला !

उत्तरप्रदेशमध्ये गेल्या काही मासांमध्ये अनेक साधूंच्या विविध कारणांवरून हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय स्थिती लक्षात येते ! भाजपच्या राज्यात अशा घटना वारंवार घडणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

आनंदमात्र स्थिती हीच आत्मस्थिती !

‘आनंद स्वरूपाची अभिलाषा हेच भक्ती-ज्ञान आणि वैराग्य होय. यालाच ‘ध्यानयोग’ म्हणतात. ही आनंद स्वरूपाची एकमेव अनुभूतीच असावी. आनंद अनुभवाविना कोणत्याही वृत्तीचा उद्गम होऊ न देणे, हेच आत्मानात्मविवेकाचे कार्य आहे.