दंगली घडवणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणा ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, परभणी

‘महाराष्ट्रातील दंगली – रझा अकादमीचे षडयंत्र ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !

हिंदुत्वनिष्ठ संघटनेशी संबंधित लोकांनाच जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

राजकीय दबावाखाली पोलीस एकांगी कारवाई करत आहेत. १२ नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या हिंसाचाराविषयी सरकार मूग गिळून गप्प का बसले आहे ?, असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

मोर्चे काढून दहशत निर्माण करणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणण्याची मागणी

त्रिपुरामधील कथित घटनांच्या निषेधार्थ महाराष्ट्रात रझा अकादमीच्या धर्मांधांनी हिंदु व्यापार्‍यांवर आक्रमण केले. दुकानांची तोडफोड, पोलिसांना मारहाण, वाहनांची जाळपोळ आणि खासगी मालमत्तेची हानी करण्यात आली होती.

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रात दंगल घडवणार्‍या जिहाद्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी !

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रात दंगल घडवणार्‍या जिहाद्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सातारा येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

माजी पालकमंत्री प्रवीण पोटे आणि माजी मंत्री जगदीश गुप्ता यांना जामीन संमत !

अमरावती हिंसाचार प्रकरणी १७ नोव्हेंबर या दिवशी स्वतःहून अटक करून घेतलेले अमरावतीचे माजी पालकमंत्री, तसेच माजी मंत्री जगदीश गुप्ता यांना १७ नोव्हेंबरच्या रात्री विलंबाने अमरावतीच्या न्यायालयाने जामीन संमत केला आहे.

अमरावती येथील हिंसाचारात रझा अकादमीसमवेत भाजप आणि युवासेना यांतील लोकांचाही हात !

अमरावती येथे झालेल्या दंगलीमागे रझा अकादमीसह राजकीय पक्षांचाही, म्हणजे; भाजप, तसेच युवा सेना यांचा हात असल्याचा महाराष्ट्र पोलिसांना संशय आहे. असा अहवाल पोलिसांकडून नुकताच गृहविभागाला सादर करण्यात आला आहे.

जातीयवादी शक्ती परिस्थितीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत ! – शरद पवार

‘‘ज्यांना सत्ता मिळाली, त्यांनी या सत्तेचा अपवापर कसा केला, हे जनतेने पाहिले आहे. सत्ता मिळत नसल्याने नैराश्यातून भाजप महाविकास आघाडीवर आरोप करत आहे. त्याला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही.

मालेगाव येथील हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांची रझा अकादमीच्या कार्यालयावर धाड !

विविध दस्तऐवज आणि कागदपत्रे जप्त !
हिंसाचारप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या ४१ वर !

हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करणारे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावर बंदी घाला !

‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावर तसेच राज्यात अराजकाची स्थिती निर्माण करणार्‍या रझा अकादमीवर बंदी घाला.

आजी-माजी नगरसेवकांनी मालेगाव पेटवल्याच्या संशयाप्रकरणी आतापर्यंत ३३ जणांना अटक !

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून मालेगाव येथील हिंसाचार प्रकरणात आजी-माजी नगरसेवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यांनीच हे प्रकरण पेटवल्याचा संशय असून आतापर्यंत ३३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.