पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या दंगल प्रकरणातून ३८ जणांची १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – येथे वर्ष २००५ मध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या दंगल प्रकरणातून ३८ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. वर्ष २००५ च्या मिरवणुकीत रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत ध्वनीवर्धक वाद्य वाजवण्यास मनाई करण्यात आली होती. याचा निषेध करत ‘शिवशक्ती मंडळा’च्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मी रस्त्यावर रात्री त्यांचा रथ जागेवरच थांबवला होता. त्यानंतर दंगल उसळली होती. या प्रकरणात १७ वर्षांनंतर निकाल लागला असून सत्र न्यायाधीश एस्.एस्. गोसावी यांनी हा आदेश दिला. दंगल आणि पोलीस अधिकार्‍यांवर दगडफेक करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ३८ जणांवर ठेवण्यात आला होता.