जालना येथे जुन्या वादातून झालेल्या मारहाणीतून शहरात दंगलीचे स्वरूप !

१ जण गंभीर घायाळ !

वादाचे पर्यावसान सहजरित्या दंगलीत होत आहे, यातून पोलिसांचा धाक अल्प झाला आहे, हे लक्षात येते. – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

जालना – शहरातील टांगा स्टॅन्ड येथे ४ जानेवारी या दिवशी जुन्या वादातून झालेल्या मारहाणीला दंगलीचे स्वरूप प्राप्त झाले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणल्याने सकाळी ११.३० वाजता शहरातील बाजारपेठा पुन्हा चालू झाल्या आहेत. शहरातील टांगा स्टॅन्ड येथे सकाळी २ जणांमध्ये जुन्या कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर दंगलीत झाले. २ समाजांतील काही जण एकत्र येऊन हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन शहरात फिरत होते. या मारहाणीत फरदीन शेख हा गंभीर घायाळ झाला असून त्याच्यावर संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.