देशात दंगल घडवून कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या धर्मांध संघटनांवर सरकार बंदी केव्हा घालणार ? – संपादक
१. भारतातील एका राज्यातील कथित घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच उमटल्याने अनेक शंका निर्माण होणे
‘नुकत्याच महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये दंगली झाल्या. त्या दंगलींचा घटनाक्रम, दंगलखोरांनी वापरलेली कार्यपद्धती आणि त्यांना उघडपणे अन् छुप्या रितीने पाठराखण करणारे समर्थक पहाता ‘या दंगली सुनियोजित होत्या’, असेच लक्षात येते. त्रिपुरा राज्यात खरंच घटना घडली होती का ? याविषयी कुणीही निश्चिती करून माहिती सांगितली नाही. भारतातील एका राज्यातील कथित घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच का उमटले ? तेही नांदेड, अमरावती आणि मालेगाव या शहरांमध्येच का उमटले ? ही मोठ्या घटनेची चाचपणी तर नसेल ? यापूर्वी नियोजनपूर्वक घडलेले घातपात किंवा देशद्रोही कारवाया यांवरून अशा शंका घ्यायला वाव आहे.
२. दंगलींचा इतिहास पहाता विविध परिणामांचा अभ्यास करण्यासाठीच आतंकवादी संघटनांकडून दंगलीचे नियोजन केले जाणे
कोणताही महत्त्वाचा उपक्रम करण्यापूर्वी त्याची सिद्धता करणे, त्यातील त्रुटी शोधणे, बारकाईने निरीक्षण करणे, परिणामकारकता वाढवण्यासाठी त्यात आवश्यक ते पालट करणे या गोष्टी केल्या जातात. यासमवेतच नियोजित घटनेचा जनमानसावर आणि राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, तसेच ध्येय गाठण्यासाठी कोणत्या प्रतिक्रिया मिळतात, याचाही अभ्यास केला जातो. त्याला आपण ‘रंगीत तालीम’ असे म्हणू शकतो. या दंगलीच्या घटना आणि त्यांची पार्श्वभूमी पहाता ‘ही एकत्रित बळ अन् त्याला मिळणारा प्रतिसाद यांची चाचणीच असावी’, असे वाटते. कुप्रसिद्ध रझा अकादमी आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनांकडून दंगलीचे नियोजन करण्यात आले. या संघटनांचा पूर्वेतिहास पहाता अशा समाजद्रोही आणि सामाजिक तेढ निर्माण करणार्या घटना घडवून आणण्यात त्यांची प्रमुख भूमिका असल्याचा अनेकांचा संशय आहे. अशा कामांसाठी त्यांना देश-विदेशातून पैसा मिळतो.
३. ‘टूलकिट’ या कृतीपद्धतीत देशद्रोही बुद्धीवादी सहभागी होणे आणि सर्वसाधारण भारतीय अनेक अयोग्य गोष्टींकडे डोळेझाक करत असल्याने त्यांची हीच वृत्ती विनाशास कारणीभूत होणे
‘टूलकिट’ म्हणजेच विश्लेषकांकडून विशिष्ट उद्देशाच्या क्रमश: पूर्ततेसाठी अभ्यासपूर्ण सिद्ध केलेली आणि अवलंबनासाठी दिलेली कृती पद्धती ! त्यात प्रत्यक्ष कृती, सामाजिक माध्यमांत पाठवण्याची वाक्ये, भाषणे, घोषणा आणि प्रशासनाकडून होणार्या संभाव्य कृतींवरील प्रतिक्रिया अशा विविध टप्प्यांचे नियोजन असते. दुर्दैवाने भारतातीलच काही देशद्रोही बुद्धीवादी त्यात सहभागी होतात. विशेष म्हणजे भारतातील संघटनांकडून त्यांना पुरवला जाणारा पैसा, हा बहुसंख्य भारतीय जनतेच्याच खिशातून विविध मार्गांनी त्यांच्यापर्यंत पोचलेला असतो. सर्वसाधारण भारतीय त्याच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक स्वप्नराज्यात रमलेला असतो. अनेक गोष्टी लक्षात आल्यावरही ‘त्या स्वतःपर्यंत आल्या नाहीत ना’, असे समजून त्याकडे डोळेझाक केली जाते. पुढे याच गोष्टी त्याच्या विनाशाला कारणीभूत होतील, याचा तो गांभीर्याने विचार करत नाही.
४. माहिती तंत्रज्ञान आणि सामाजिक माध्यमे यांच्याद्वारे विविध गोष्टी समाजापर्यंत पोचवल्या गेल्याने प्रत्येकाला ऊर्जितावस्था प्राप्त होणे
सुदैवाने ज्या गोष्टी प्रदीर्घ काळापासून लपवण्यात आल्या होत्या, त्या माहिती तंत्रज्ञान आणि सामाजिक माध्यमे यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचत आहेत. त्यामुळे समाज जागृत होत आहे. जेव्हा समाजातील प्रत्येकाला ऊर्जितावस्था प्राप्त होऊन तो आजूबाजूला पाहू लागेल, तेव्हा सत्य लपवता येणार नाही. वैयक्तिक, पक्षीय आणि घराणेशाही यांच्या स्वार्थासाठी समाजविघातक अन् देशद्रोही शक्तींना बळ देणारे क्षुद्र राजकारणी आता जनतेपासून लपून रहाणार नाहीत.
५. मानसिक आणि बौद्धिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी साधना करणे अपरिहार्य !
विशिष्ट ‘अजेंडा’ (कार्यक्रम) समोर ठेवून शाहीनबाग, शेतकरी आंदोलन, त्रिपुरातील खोट्या घटनेवरून झालेल्या दंगली यांच्या माध्यमातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारा प्रचार करण्यात आला. त्याला जनतेने भुलू नये. आपल्यामध्ये मानसिक आणि बौद्धिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी साधना करणे अपरिहार्य आहे. देशद्रोही शक्तींचा नि:पात करण्यासाठी पृथ्वीतलावर अनादी काळापासून ईश्वरनिर्मित धर्मपालन आणि साधना करून आपल्यामध्ये शक्ती, संयम अन् नीतीमत्ता निर्माण केली पाहिजे. यासाठी गुरुकृपा संपादन करण्याविना दुसरा पर्याय नाही.’
– एक माजी पोलीस अधिकारी