खांडवा (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेत बकरी ईदच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून नमाजपठण करवून घेतले !

सण साजरा करणे वेगळे आणि मुलांकडून नमाजपठण करून घेणे वेगळे. ‘मुसलमान विद्यार्थ्यांकडून गीतापठण करून घेतले असते, तर एव्हाना काय झाले असते’, याचा विचार शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने करावा !

धर्मांतर करण्‍यासाठी आलेल्‍या महिलांची सखोल चौकशी करण्‍याची मागणी !

पुणे जिल्‍ह्यातील दौंड येथून ३ ख्रिस्‍ती महिला काष्‍टी येथे रहाणारे मयूर मदरे यांच्‍या घरी बळजोरीने घुसल्‍या. त्‍यांनी मयूर आणि त्‍याची आई यांना ‘तुम्‍ही ख्रिस्‍ती धर्मात प्रवेश करा म्‍हणजे तुमची सर्व संकटे आणि अडचणी दूर होतील, तसेच तुमच्‍या मुलाचे लग्‍नही होईल’, असे सांगून कपाळाला तेल लावले अन् येशू ख्रिस्‍ताची प्रार्थना म्‍हणण्‍यास आरंभ केला.

‘गेम जिहाद’च्या माध्यमातून विवाहित हिंदु महिलेचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच त्यांची अशी केविलवाणी स्थिती झाली आहे. त्यामुळेच धर्मांध मुसलमान नवनवीन क्लृप्त्या योजून हिंदूंचा सहज बुद्धीभेद करत आहेत आणि त्यात यशस्वी होत आहेत, हे लक्षात घ्या !

बरेली (उत्तरप्रदेश) येथे डॉ. जावेद खान याने जिभेच्या शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या हिंदु मुलाची बळजोरीने केली सुंता !

स्वतःच्या व्यवसायाचा वापर हिंदूंच्या धर्मांतरासाठी करणारे धर्मांध डॉक्टर. अशा डॉक्टरांचा परवाना रहित करून त्यांना आजन्म कारागृहात डांबणे आवश्यक !

‘इन्क्विझिशन’विषयी (धर्मच्छळाविषयी) विद्यार्थ्यांना माहिती होणे आवश्यक ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकत्यात झालेल्या एका कार्यक्रमात पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा नष्ट करण्याचे आवाहन गोमंतकियांना केले होते. यावरून तथाकथित विचारवंत, काँग्रेस पक्षातील काही नेते आदींनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

धर्मांतरितांचे शुद्धीकरण केल्यानंतर कायदेशीर वैधता प्राप्त होण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी ! – अधिवक्ता नागेश जोशी, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद, गोवा

हिंदूंचे अन्य पंथात धर्मांतर झाल्याची कागदपत्रे मिळतात; पण हिंदु धर्मात ‘घरवापसी’ झाल्याची कागदपत्रे बहुदा मिळत नाहीत. त्यामुळे कागदोपत्री माहितीला जमा करण्याला महत्त्व आहे.

लव्‍ह, इलेक्‍ट्रॉनिक, सर्व्‍हिस आणि पॉवरहंग्री या ४ प्रकारांतून मोठ्या प्रमाणात जिहाद फोफावत आहे ! – आमदार अधिवक्‍ता आशिष शेलार

‘द केरला स्‍टोरी’ हे केवळ निमित्त असून काही लोक १०० कोटी कमवण्‍यासाठी चित्रपट बनवतात; पण आम्‍ही १०० कोटींना जागृत करण्‍यासाठी चित्रपट बनवला आहे. त्‍यामुळे देशाला इस्‍लामिक आतंकवादाची प्रयोगशाळा होऊ द्यायची कि नाही, हे तुमच्‍या हाती आहे.

‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला बळी पडलेल्या मुलींना सोडवण्यासाठी दक्षता समित्यांची स्थापना करणे आवश्यक ! – अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ, गोवा.

गोवा येथील एक हिंदु मुलगी पुणे येथे नोकरीनिमित्त असतांना एका धर्मांध तरुणाने हिंदु बनून तिच्याशी परिचय वाढवला आणि नंतर तिच्याशी लग्न केले. त्यानंतर मुसलमान बनण्यासाठी तिच्यावर दबाव निर्माण केला.

ख्रिस्ती धर्म प्राचीन असल्याचा खोटा प्रचार करून ख्रित्यांकडून  भारतात धर्मातर ! – एस्थर धनराज, सल्लागार, भारतीय स्वाभिमान समिती, तेलंगाणा

‘जोपर्यंत भारतातील भूभाग ख्रिस्त्यांसाठी देत नाही, तोपर्यंत त्यांच्याकडून हिंदूंचे धर्मातर चालू राहील’, अशा प्रकारे ख्रिस्ती मिशनर्‍यांचा प्रचार चालू आहे. असे असूनही ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कोणतीही कारवाई होत नाही.

छोट्या संघटनांना एकत्र करून हिंदुत्वाचे कार्य करायला हवे ! – पू. रामबालक दासजी महात्यागी महाराज, संचालक, श्री जामडी पाटेश्‍वरधाम सेवा संस्थान, पाटेश्‍वर धाम, छत्तीसगड

जे धर्मांतरित झाले त्यांना दूर न लोटता त्यांना प्रेमाने जवळ करायला हवे. असे केल्यास हिंदूंचे धर्मांतर होणार नाही. प्रभु श्रीराम यांनी वनवासाच्या काळात वानरांसह वनवासींना प्रेम देऊन आपल्या कार्यात जोडून घेतले. प्रभु श्रीरामांचा आदर्श घेऊन आपणाला कार्य करायचे आहे.